एक्स्प्लोर

Gauri Pujan 2024 : आज गौरी पूजन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

Gauri Pujan 2024 : भाद्रपदात गणपती पाठोपाठ गौरीचं आगमन होतं, तिचं माहेरपण करताना कोणतीही उणीव राहू दिली जात नाही. यंदा गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया.

Gauri Pujan 2024 : महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ गौरी पूजन. हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. स्त्रिया अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी हे व्रत करतात.

गौरी पूजन हा सण ज्येष्ठ गौरी पूजन या नावानेही ओळखला जातो, या वर्षी 10 सप्टेंबर रोजी हा शुभ सण सुरू झाला आहे आणि तो 12 सप्टेंबर 2024 रोजी संपेल.

बुधवारी 11 सप्टेंबरला ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन करावं. तसंच 12 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन करावं, असं ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.

गौराईचं आगमन कधी?

मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 रोजी

ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त

सकाळी 6:04 ते संध्याकाळी 6:32 पर्यंत

कालावधी - 12 तास 28 मिनिटं

ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त

बुधवार, 11 सप्टेंबर 2024 रोजी

भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला म्हणजे बुधवारी 11 सप्टेंबरला गौरी पूजन, नैवेद्य आणि हळदीकुंकू असणार आहे.

ज्येष्ठा गौरी विसर्जन

गुरुवार, 12 सप्टेंबर 2024 रोजी

भाद्रपद शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजे, गुरुवारी 12 सप्टेंबरला गौरी - गणपतीचं विसर्जन आहे. यादिवशी सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे.

ज्येष्ठा गौरी पूजन पद्धत

माता गौरीला शुद्ध पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ स्टूलवर कापड पसरावं, त्यावर गौरी विराजमान कराव्यात. त्यानंतर गौरीला साडी नेसवून सोळा अलंकार केले जातात.

त्यानंतर गौरीच्या कपाळावर हळद, कुंकू आणि अक्षत लावतात. ज्येष्ठा गौरीच्या दिवशी गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका शुभ मुहूर्तावर केली जाते.

नैवेद्याच्या दुसऱ्या दिवशी 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या, 16 पदार्थ गौरीला अर्पण केले जातात. यानंतर 16 दिव्यांनी गौरीची आरती करण्याची श्रद्धा आहे.

ओवसा

अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते. ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणं किंवा ओवसणं , ज्याला ववसा असंही म्हटलं जातं. या परंपरेद्वारे घरातील सुनेला मानसन्मान दिला जातो. त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Guru Vakri 2024 : दिवाळीआधी गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचा अडचणींचा काळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात आतापासूनच थोडं सावध                                                       

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget