Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीला जुळून आला शुभ ग्रहांचा योग; 'या' 3 राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, देणार भरभरुन आशीर्वाद
Ganesh Chaturthi 2025 : आजच्या दिवशी अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. तसेच, नवपंचम राजयोग, रवि योग, लक्ष्मी नारायळ योगाची निर्मिती होणार आहे.

Ganesh Chaturthi 2025 : वैदिक शास्त्रानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार, आज राज्यासह देशभरात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2025) उत्सव साजरा केला जातोय. आज सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. आजच्या दिवशी अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. तसेच, अनेक राजयोग देखील निर्माण झाले आहेत. या दिवशी नवपंचम राजयोग, रवि योग, लक्ष्मी नारायळ योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर आज गणेशाची कृपा असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या दिवशी लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती होणार आहे. तसेच, शुक्र-वरुण नवपंचम राजयोग देखील लाभदायी ठरणार आहे. भगवान गणेशाच्या कृपेने तुमच्या आर्थिक संपत्तीत भरभराट होईल.तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. तसेच, घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. गणरायाच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच, मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. या राशीच्या सप्तम भावात धन योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. तसेच, या काळात तुमच्या कलागुणांना देखील चांगली वाट मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. मानसिक शांतता राहील. नवनवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात होणारा महालक्ष्मी योग फार शुभकारक ठरेल. तसेच, विद्यार्थ्यांना देखील या काळात चांगला लाभ मिळेल. तुमच्या पदोन्नतीत सुधारणा होईल. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, नशिबाची साथ तुमच्या बरोबर असणार आहे. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. गणरायाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















