Diwali 2023: दिवाळीच्या संध्याकाळी चुकूनही करू नका 'ही' 3 कामं; लक्ष्मी होईल नाराज
Diwali 2023: धार्मिक मान्यतांनुसार, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवाळीची संध्याकाळ खूप खास असते. परंतु या दिवशी काही कामं टाळली पाहिजे, अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते.
Diwali 2023: हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2023) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. असं म्हटलं जातं की, देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर संपत्तीची कमी राहत नाही आणि घरात लक्ष्मी वास करते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं आणि या दिवशी घरात याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात. इतकंच नाही तर लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात, परंतु दिवाळीच्या रात्री शास्त्रात अशी काही कामं सांगितली आहेत, जी संध्याकाळ झाली की चुकूनही करू नये, अन्यथा देवी लक्ष्मीचा कोप होतो.
संध्याकाळनंतर झाडू नका
ज्योतिष शास्त्रात अशी अनेक कामं सांगितली आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, तर काही कामं अशीही आहेत, ज्यामुळे लक्ष्मी खूप नाराज होते. दिवाळीपूर्वी सर्वजण घराची साफसफाई करतात. असं मानलं जातं की, स्वच्छ ठिकाणीच लक्ष्मीचा वास असतो. पण काही लोक संध्याकाळ झाली की किंवा रात्रीच्या वेळीही घरात झाडू मारतात. या दिवशी रात्रीच्या वेळी घर झाडू नये, संध्याकाळनंतर कचरा टाकू नये, यामुळे घरातील सुख-समृद्धी नाहीशी होते.
दिवाळीत जुगार खेळू नका
धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी काही कामं अजिबात करू नये. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी जुगार खेळू नये आणि दारू पिऊ नये, यामुळे माता लक्ष्मी रागावते. तसेच घरात पैशांशी संबंधित समस्या निर्माण होतात, अशा घरांमध्ये लक्ष्मी अजिबात वास करत नाही.
घरातील महिलांचा आदर करा
शास्त्रानुसार, ज्या घरांमध्ये लक्ष्मी पूजनाच्या शुभ दिवशी मांस, दारू, जुगार इत्यादी खेळ खेळले जातात, त्या घरांमध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही. या घरांमध्ये नेहमीच पैशांची कमतरता असते. सोबतच असं देखील म्हटलं जातं की, ज्या घरांमध्ये महिलांचा आदर केला जात नाही, त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही.
या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे, 12 नोव्हेंबरला हे दोन्ही दिवस साजरे केले जात आहेत. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी. मात्र, यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Diwali 2023: दिवाळीला बनला महालक्ष्मी राजयोग; 'या' राशींच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ