Chanakya Niti : ज्यांनी 'या' 5 गोष्टींचा अवलंब केला नाही, अशी माणसं जनावरांप्रमाणे असतात
Chanakya Niti : चाणक्याने अशी अनेक धोरणे दिली आहेत. जी कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता वाढवतात.
Chanakya Niti : जसा गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. प्रत्येक पावलावर योग्य मार्ग दाखवतो, त्याचप्रमाणे जेव्हा आपण संकटांनी घेरलेलो असतो तेव्हा चाणक्याची धोरणे आपल्याला मार्गदर्शन करतात. चाणक्य नीतीमध्ये, चाणक्याने अशी अनेक धोरणे दिली आहेत, जी कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता वाढवतात. चाणक्याने असे 5 गुण दिले आहेत, त्यापैकी कोणताही गुण माणसामध्ये नसेल तर तो प्राण्यासारखा आहे.
ज्ञान
आचार्य चाणक्य यांनी आपल्या श्लोकात म्हटले आहे की, ज्याला ज्ञान नाही तो पशूसारखा आहे. देवाने ज्ञान मिळवण्याची संधी फक्त माणसाला दिली आहे, प्राण्यांना नाही. ज्ञान ही अशी संपत्ती आहे, जी माणसाकडून कधीही संपुष्टात येत नाही. शिक्षणानेच जीवनात यश मिळते.
तप
ज्या लोकांच्या मनात धार्मिक भावना नसते, त्यांचे मन नेहमी अस्वस्थ असते. चाणक्याच्या मते नास्तिक प्रवृत्ती असलेल्या लोकांना जीवनात शांती मिळत नाही. सत्कर्म आणि परमेश्वराची आराधना केल्याने यशाचे मार्ग खुले होतात. ध्येय साध्य करण्यासाठी तपश्चर्या करावी.
दान
शास्त्रात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जो व्यक्ती दान करत राहतो त्याच्या सर्व समस्या दूर होतात. गरजूंना केलेले दान माणसाला श्रीमंत बनवते. चाणक्य नुसार, जो व्यक्ती फक्त स्वतःसाठी पैसा कमावतो पण दान करत नाही, त्याचे कर्म प्राण्यांसारखे असते.
नम्रता
चाणक्याच्या मते नम्रता म्हणजे संवेदनशीलता. आपल्या भावना व्यक्त करण्याचा बहुमान देवाने फक्त मानवालाच दिला आहे. अशा परिस्थितीत माणूस सुख-दु:खात आपल्या भावना व्यक्त करू शकत नसेल, तर त्याचे आयुष्य एखाद्या प्राण्यासारखे असते.
धर्म
चाणक्य म्हणतात की, अधर्माचा मार्ग स्वीकारलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे. अशी माणसे जगात माणसांसारखी नसून प्राण्यांप्रमाणे जगतात. धर्माचे पालन करणारी व्यक्ती चुकीची कामे करत नाही. चांगल्या कर्मांमुळे माणसाचे जीवन सुधारते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे..