Chanakya Niti : ज्या व्यक्तीमध्ये 'हा' गुण असतो, तो प्रत्येक समस्या चुटकीसरशी सोडवतो, चाणक्य म्हणतात...
Chanakya Niti : चाणक्याने एका श्लोकात राजहंसाचे उदाहरण देऊन यश मिळवण्याचा निश्चित मार्ग सांगितला आहे. चाणक्यनीतीत म्हटलंय, धोरणे नीट पाळली तर माणूस हरलेली पैजही जिंकू शकतो.
Chanakya Niti : यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला आहे. ज्याच्यामुळे यश सहज शक्य आहे. आचार्य चाणक्यांची धोरणे नीट पाळली तर माणूस हरलेली पैजही जिंकू शकतो.
यश मिळवण्याचा निश्चित मार्ग
चाणक्यांनी एका श्लोकात राजहंसाचे उदाहरण देऊन यश मिळवण्याचा निश्चित मार्ग सांगितला आहे. ते म्हणतात की, ज्याने राजहंसाचा हा एक गुण अंगीकारला आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. तो क्षणार्धात प्रत्येक समस्या सोडवू शकतो. जाणून घ्या यश मिळवण्यासाठी चाणक्याने हंसाचा कोणता गुण सांगितला आहे.
अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्या अल्पं च कालो बहुविघ्नता च ।
आसारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ।।
हंसाकडून जाणून घ्या हे गुण
चाणक्याने या श्लोकात सांगितले आहे की, या जगात अनेक प्रकारची शास्त्र आणि ज्ञान आहेत. मानवी जीवन खूप थोडे आहे आणि त्यात अनेक प्रकारचे अडथळे आणि संकटे येतात.
जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल, तर व्यक्तीला राजहंसाचे विशेष गुण अंगीकारले पाहिजेत. जसे हंस पाण्यात मिसळलेले दुध पितो आणि पाणी सोडून देतो. त्याचप्रमाणे माणसाने आवश्यक ज्ञानाचा विचार करून ते स्वीकारावे व इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
यशासाठी करा हे काम
चाणक्य म्हणतात की, संपूर्ण विश्व हे ज्ञानाने भरलेले आहे. ज्यामध्ये काही उपयुक्त आणि काही निरुपयोगी गोष्टींचे मिश्रण आहे. जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडताना हे सर्व ज्ञान मिळवता येत नाही.
चाणक्यांच्या मते, ज्या व्यक्तीला एखाद्या विषयाचे कमी पण पूर्ण ज्ञान असते, तो प्रत्येक संकटाला हसतमुखाने सामोरे जातो आणि त्यावर मातही करतो. यशस्वी होण्यासाठी माणसाने दुधाच्या रूपात संसाररूपाने ज्ञान घ्यावे.
धीर धरा
एक उदाहरण देताना चाणक्य म्हणाले की, ज्याप्रमाणे लाकडात असलेला अग्नी संपूर्ण जंगल नष्ट करतो, त्याचप्रमाणे माणसाच्या आत जळणारा क्रोधाचा अग्नी बुद्धीचा नाश करतो, रागाच्या माणसाची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती शून्य होते. आणि याचा फायदा शत्रू घेतात. शत्रूसमोर तुमचा पराभव दिसत असला तरी शत्रूला त्याचा सुगावाही लागू देऊ नका. धीर धरा. मन शांत ठेवल्यास शत्रूवर हल्ला करण्याची शक्ती विकसित होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय..