Chanakya Niti : कधीच भासणार नाही आर्थिक चणचण, ‘श्रीमंत’ व्हायचंय तर चाणक्य नीतिच्या ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा!
Chanakya Niti : चांगले जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. पैसा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पैसा आपल्याला प्रत्येक नात्याचा खरेपणा दाखवतो.
Chanakya Niti : चांगले जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. पैसा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पैसा आपल्याला प्रत्येक नात्याचा खरेपणा दाखवतो. कारण, जेव्हा लक्ष्मी अर्थात पैसा जवळ असतो, तेव्हा सगळे नातवाईक, मित्र-मैत्रिणी जवळ असतात. पैसा असेल तरच लोक तुमच्या गरजेला उभे राहतात. पण, लक्ष्मी साथ सोडते, तेव्हा आपल्या जवळचे लोक देखील आपली साथ सोडून जातात. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी चाणक्य नीतिमध्ये अशाच अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.
संपत्ती आणि लक्ष्मी यांना टिकवून ठेवायचे असेल, तर चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला जाणून घेऊया, गरिबीपासून दूर राहण्यासाठी चाणक्य काय सांगतात...
बचत
खर्चावर नियंत्रण ठेवणे हा पैसा वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे चाणक्यंनी म्हटले आहे. जितका पैसा कमवणे महत्त्वाचे आहे, तितकाच तो जतन करणेही महत्त्वाचे आहे. जे धन संपत्ती वाचवून ठेवतात, त्यांना आयुष्यात कधीच कुणासमोर हात पसरावा लागत नाही. अशी माणसं कितीही वाईट परिस्थिती आली तरी, आपलं आयुष्य सामान्यपणे जगतात.
पैशाचा योग्य वापर
लक्ष्मी चंचल मानली जाते, त्यामुळे धनाचा वापर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेनुसार केला पाहिजे. जो माणूस पाण्यासारखा पैसा खर्च करतो, त्याला एक दिवस संकटाचा सामना करावा लागतो. चाणक्यंच्या मते, जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आणि पैशाची कमतरता टाळण्यासाठी व्यक्तीने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. जर, ध्येय निश्चित केले नाही, तर त्या व्यक्तीला यश मिळू शकत नाही. चाणक्य नीतिनुसार पैशाशी संबंधित कामांची माहिती काहीही इतर कोणालाही देऊ नये. पैशाचा वापर सुरक्षा, दानधर्म आणि व्यवसायात गुंतवणूक म्हणून करा.
चुकीच्या मार्गाने कमाई
कधीही पैशाच्या मागे धावू नये. पैशासाठी अधर्माचा मार्ग निवडू नये. अनैतिक काम करून मिळवलेला पैसा फार काळ टिकत नाही. अशा प्रकारे कमावलेल्या पैशामुळे त्या व्यक्तीला नुकसान सहन करावे लागू शकते.
दानधर्म
चाणक्य नीतिनुसार पैशाने व्यक्तीला सन्मान मिळतो. म्हणूनच आपल्या कमाईचा काही भाग परोपकारासाठी खर्च केला पाहिजे. त्यामुळे गरजूंना मदत होते आणि व्यक्तीचा सन्मान वाढतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :