(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज राशी परिवर्तन योगासह बनले अनेक शुभ योग; 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, शनि अमावस्येचा होणार दुप्पट फायदा
Panchang 30 November 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी राशी परिवर्तन योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 4 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 30 November 2024 : आज शनिवार, 30 नोव्हेंबर रोजी चंद्र मंगळाच्या वृश्चिक राशीत जाणार आहे आणि मंगळ चंद्राच्या कर्क राशीत आहे, त्यामुळे राशी परिवर्तन योग तयार होत आहे. तसेच, आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे आणि आज 2024 मधील शेवटची शनि अमावस्या आहे.
शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी राशी परिवर्तन योगासह अतिगंड योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 4 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. या राशीचे लोक जे विवाहित आहेत किंवा आधीच नातेसंबंधात आहेत ते आज त्यांच्या जोडीदारांसोबत प्रेमळ क्षण घालवतील. सामाजिक कार्यात गुंतलेल्या लोकांना मानसन्मान मिळू शकतो. शनिदेवाच्या कृपेमुळे आज व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही इतर व्यवसायातही गुंतवणूक करण्याचा विचार कराल. कौटुंबिक जीवनात गोडवा येईल. तुम्ही संध्याकाळी काही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज शनिश्चरी अमावस्येचा दिवस शुभ असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज भाऊ, मित्र आणि जवळच्या लोकांकडून चांगलं सहकार्य मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. अमावस्या तिथीमुळे घरामध्ये धार्मिक वातावरण राहील. आज तुम्ही व्यवसायात काही नवीन योजनांवर लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर आज नोकरदारांसाठी कार्यालयीन वातावरण चांगलं असेल, कामं वेळेवर पूर्ण होतील. शनिदेवाच्या कृपेने आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने आज तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आज तुम्हाला उच्च पदावर असलेल्या राजकीय किंवा प्रशासकीय व्यक्तीचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक फायदे मिळतील. तुम्हाला जमीन किंवा घर घ्यायचं असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्यांना आज अशा कोणाची साथ मिळेल जो तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात मदत करेल. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम असतील. संध्याकाळी देव दर्शनाचा लाभ घ्याल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आजचा म्हणजेच शनिश्चरी अमावस्येचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. धनु राशीच्या लोकांनी विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नये आणि आपलं काम करत राहावं, तरच भविष्यात उजळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न ठरू शकतं, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. जर कुटुंबात काही कलह चालू असेल तर आज ते सोडवले जातील, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: