एक्स्प्लोर

Astrology : आज वेशी योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना लाभच लाभ, अडलेली कामंही होणार पूर्ण

Panchang 15 September 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी वेशी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 15 September 2024 : आज रविवार, 15 सप्टेंबरला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला रवि प्रदोष व्रत केलं जाणार आहे. रवि प्रदोष व्रताच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी असा वेशी योग तयार होत असून, आज वेशी योगासह सुकर्म योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा म्हणजे, रवि प्रदोष व्रताचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. आज अनेक प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळेल. रविवारच्या सुट्टीमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतील. महादेवाच्या कृपेने आज तुम्हाला होणारा त्रास अचानक दूर होईल आणि तुमचं भाग्य वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगल्या नफ्याचे संकेत मिळत आहेत आणि ते इतर व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करतील. आज एक विशेष व्यक्ती अविवाहित लोकांच्या आयुष्यात येऊ शकते, जी त्यांना मनापासून खूप खुश करेल. सासरच्या कोणाशी काही वाद चालू असेल तर ते आज संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

सिंह रास (Leo)

आज रवि प्रदोष व्रताचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होईल आणि पैशाशी संबंधित कामं पूर्ण होतील. आज तुम्ही वाहन, मालमत्ता, इलेक्ट्रीक उपकरणं इत्यादी महागड्या वस्तू खरेदी करण्याची शक्यता दिसते. तुम्ही तुमच्या उत्पन्नात वाढ देखील पाहू शकता, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न आज वाढेल. आज तुमच्या हुशारीने तुम्ही तुमचं काम इतरांकडून सहज करून घेऊ शकाल. जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर आज ही चिंता देखील दूर होईल आणि तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल.

तूळ रास (Libra)

आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. तूळ राशीचे लोक आज जे काही काम करतील त्यात नक्कीच यश मिळेल आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. ज्या प्रलंबित कामांबद्दल तुम्ही खूप दिवसांपासून चिंतेत होता ती आज महादेवाच्या कृपेने पूर्ण होऊ लागतील आणि तुमचं आरोग्यही पूर्णपणे चांगलं राहील. वैवाहिक जीवनात काही तणाव चालू असेल तर तो आज संपेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. संध्याकाळ एखाद्या धार्मिक ठिकाणी घालवाल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. धनु राशीचे लोक आज पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये असतील आणि रविवारी सुट्टीचा आनंद घेतील. या राशीचे लोक ज्यांना प्रवास, शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या नात्याला ओळख मिळेल. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक लाभ होईल. आज विद्यार्थ्यांना प्रत्येक पावलावर वडिलांची आणि शिक्षकांची साथ मिळेल. संध्याकाळी घरी विशेष पाहुण्यांचं आगमन होईल.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. कुंभ राशीचे लोक आज स्वभावाने दानशूर दिसतील. रविवारच्या सुट्टीमुळे घरातील मुलांचा खूप गोंगाट होईल आणि तुम्हाला त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत मिळून तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. आज व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफाही मिळेल. आज तुम्ही घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल आणि आरामदायी जीवन जगण्यावर अधिक भर द्याल. मित्रांसोबत संध्याकाळ घालवाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 15 September 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray on One Nation One Election : एक देश - एक निवडणुकीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रियाBachchu Kadu PC : अशा नामर्द सरकारलाच वटणीवर आणायचे, कांदाप्रश्नावरून बच्चू कडू आक्रमकRupali Chakankar On Rohini Khadse : खडसे परिवारामध्ये कोण कुठल्या पक्षामध्ये तेच कळत नाहीNaseem Khan On One Nation One Election : महाराष्ट्राची निवडणूक आली म्हणून खोडा घालण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
Kadambari Jethwani : तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणारी कादंबरी जेठवाणी आहे तरी कोण? अधिकारी निलंबित झाल्याने नेमकं घडलं तरी काय?
Embed widget