Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
वयाची पन्नाशी गाठलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन कमी होते. म्हणजेच लैंगिक इच्छा होणऱ्या या हार्मोनची पातळी घटते.
Men Menopose: चाळीशीनंतर महिलांना जसा मेनोपॉजच्या समस्येतून जावं लागतं तसंच पुरुषांनाही मेनोपॉज येतो हे तुम्हाला माहितीये का? पण पुरुषांना कुठे मासिक पाळी येते? असा प्रश्न पडणं स्वाभाविक. रजोनिवृत्तीनंतर लैंगिक इच्छा कमी होणं यासासह प्रजनन अवयवांमध्ये ल्युब्रिकेशन नसणं अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांमध्येही काही हार्मोनल बदल होतात. पुरुषांच्या या शारीरिक बदलाला मनोपॅाज नाही तर एंड्रोपॉज म्हणतात.
महिलांच्या मेनोपॉजपेक्षा एंड्रोपॉज वेगळा कसा?
मेनोपॉजमध्ये महिलांच्या प्रजननाची क्षमता हळूहळू संपून जाते. पण पुरुषांमध्ये यानंतरही शुक्राणूंची निर्मिती होत असते तसेच त्यांची प्रजनन क्षमताही असते. सामान्यपणे मेनोपॉज हा स्त्रियांच्या जैविकतेचा शेवट मानला जातो. पण एंड्रोपॉजमध्ये नपुंसकत्व किंवा इरेक्टाइल डिस्फंक्शन होतं असं मानलं जात असलं तरी एंड्रोपॉजमुळे पुरुषाची फर्टिलिटी संपत नाही.
एंड्रोपॉजमध्ये नक्की होतं काय?
वयाची पन्नाशी गाठलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन कमी होते. म्हणजेच लैंगिक इच्छा होणऱ्या या हार्मोनची पातळी घटते. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, मूत्रपिंड तसेच मानसिक ताण अशा आजारांची शक्यता बळावते.
टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी कसा होतो?
पुरुषांमध्ये असणारा टस्टोस्टेरॉन हार्मोनएका विशिष्ट वयानंतर कमी होण्यास सुरुवात होते. त्यानंतर शारीरिक, लैंगिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये रक्ताभिसरण, जैविकदृष्ट्या उपलब्ध असणाऱ्या टेस्टोस्टेरॉनमध्ये हळूहळू वाढ होते.
काय आहेत एंड्रोपॉजची लक्षणं?
1. शरीरात चरबी जमा होणे
2. लैंगिक रोग
3. कमी कामवासना
4. निद्रानाश
5. त्वचा पातळ होणे
6. त्वचेतील कोरडेपणा
7. चिडचिड आणि मूड स्विंग्स
8. नैराश्य
महिलांप्रमाणे पुरुषांनाही तपासण्यांची गरज आहे.
मेनोपॉज झाल्यावर जशी महिलांना वेगवेगळ्या वैद्यकीय तपासण्यांची गरज असते. तशीच पुरुषांनाही डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी अधिक होत असताना शरिरात होणारे बदल अनेकदा दुर्लक्षित केले जातात. यासाठी कोणता उपचार सर्वोत्तम आहे हे तज्ञांच्या सल्ल्याने ठरवावे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )