एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 25 May 2023 : मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश, कौटुंबिक वातावरण आनंदी; जाणून घ्या राशीभविष्य

Aries Horoscope Today 25 May 2023 : मेष राशीच्या नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या चणचण भासणार नाही.

Aries Horoscope Today 25 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च अधिकाऱ्यांशी बोलताना वाणीत गोडवा ठेवावा लागेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही कोणतेही नवीन काम करू शकता. ज्यामध्ये तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. नोकरीच्या शोधात जे फिरत आहेत त्यांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरामध्ये हवन, पूजा, पाठही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोक ये-जा करतील. कुटुंबात सुरू असलेली तेढ संपेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते वेळेवर परत करा. 

आर्थिक चणचण भासणार नाही

मेष राशीच्या नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या चणचण भासणार नाही. आज तुम्हाला तुमच्या व्यवहारात चांगला मोबदला मिळेल. सामाजिक क्षेत्रात सामूहिक गोष्टींची आवड निर्माण होईल. नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल. आज तुमच्या कुटुंबातील लोकांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून गैरसमज होतील. पण, तुम्ही हे गैरसमज दूर करू शकता. शक्य असल्यास कुटुंबाबरोबर संध्याकाळी बाहेर फिरायला जा. तुम्हाला प्रसन्न वाटेल.

आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल

आज तुमचं तुमच्या भावंडांशी खूप पटेल. तुम्ही जुळवून घ्याल. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील. घरात कोणताही कलह नसेल. घरचं वातावरण अगदी आनंदात असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, आज तुमचा आध्यात्माकडे कल वळेल. आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल. मानसिक समाधान मिळेल. पण, शारीरिक थकवा जाणवेल.

आज मेष राशीचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु शारीरिक थकव्यामुळे तुमचा उत्साह थोडा कमी दिसेल. थकवा दूर करण्यासाठी काही काळ विश्रांती घ्या.     

आज मेष राशीसाठी उपाय

हनुमान चालिसाचे पठण करा आणि फळांचे दान करा. याबरोबरच गूळ खाऊन कामाला जा. तुमच्यासाठी चांगले राहील.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 May 2023 : आजचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget