Buldhana News: बळीराजा पुन्हा संकटात; राज्यातील 6 लाख हेक्टरवरील तूरीचं पीक धोक्यात, बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव
राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्यानं दुष्काळसदृष्य परिस्थिती उद्भवते आणि त्यामुळे खरीप हंगामातील पिकंही आली नाहीत.
Maharashtra Buldhana News: कमी अधिक पाऊस (Rain Updates) आणि बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिक गेल्यानंतर आता तुरीच्या पिकांकडून शेतकऱ्याला अपेक्षा होती. मात्र, बदलत्या हवामानामुळे तुरीवरही आता 'फायटोप्थोरा ब्लाईट' या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सहालाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं आहे.
राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्यानं दुष्काळसदृष्य परिस्थिती उद्भवते आणि त्यामुळे खरीप हंगामातील पिकंही आली नाहीत. शेतकऱ्यांना आता थोडीफार अपेक्षा होती ती तुरीच्या पिकाची. पण, राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचं पीक हिरवेगार होतं. मात्र, याही पिकांवर बदलत्या वातावरणामुळे 'फायटोप्थोरा ब्लाईट' या बुरशीजन्य रोगानं शिरकाव केला आहे. आता हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकू लागलं आहे. यामुळे मात्र आता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
एक आठवड्यापूर्वी हिरवीगार असलेली तूर काही दिवसांतच सुकून पिवळी पडत आहे. राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीचे पीक लागवड करण्यात आली आहे. मात्र, या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असा आवाहन कृषी अधिकारी करताना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षीही याच रोगानं तुरीचं पीक हे जवळपास 50 ते 60 टक्के उत्पादन घटलं होतं आणि याही वर्षी हीच भीती आता निर्माण झाली आहे.
रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी सामना
रब्बीच्या हंगामात (Rabi Season) शेतकऱ्यांना (Farmers) अवकाळीशी (Maharashtra Unseasonal Rain) सामना करावा लागणार आहे. राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Rain Updates) तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या (Department of Meteorology) वतीनं देण्यात आला आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. आज तुरळक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजही देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी सामना; राज्यात पुढील 4-5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा