एक्स्प्लोर

Narendra Singh Tomar : देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, कृषीमंत्र्यांचा दावा, शेतकऱ्यांच्या यशोगाथा असलेल्या ई-पुस्तकाच प्रकाशन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले.

Narendra Singh Tomar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत, उत्पन्न वाढलेल्या 75 हजार शेतकऱ्यांच्या यशोगाथांचं संकलन असलेल्या ई-पुस्तकाचे प्रकाशन तोमर यांच्या हस्त झालं. यावेळी ते बोलत होते. देशात कृषीक्षेत्र आणि शेतकऱ्यांची प्रगती अत्यंत झपाट्यानं होत असल्याचेही तोमर यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्र आणि राज्य सरकारांसह भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), कृषी विज्ञान केंद्रे यासह अनेक घटकांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत. त्यामुळं लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात यश आल्याचे प्रतिपादन तोमर यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत, उत्पन्न वाढलेल्या लाखो शेतकऱ्यांपैकी, 75,000 शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे संकलन असलेल्या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याशिवाय, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, अशा शेतकऱ्यांची राज्यनिहाय यादीदेखील यावेळी प्रकाशित करण्यात आली आहे. ही ई-पुस्तके आयसीएआरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यावेळी आयसीएआरच्या 94 व्या स्थापना दिनानिमित्त, तोमर यांच्या हस्ते, कृषिवैज्ञानिक आणि शेतकऱ्यांना पुरस्कारही वितरित करण्यात आले.

आयसीएआर स्थापना दिवस 'संकल्प दिवस' म्हणून साजरा करावा

आयसीएआरच्या दिल्लीतील, पुसा संस्थेच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. गेल्या वर्षीच आयसीएआरने असा निश्चय केला होता, की यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार शेतकऱ्यांच्या यशोगाथा एकत्रित करुन, त्यांचा एक दस्तऐवज तयार करायचा. त्यांचा हा संकल्प आज पूर्ण होत आहे. त्यामुळं आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला असल्याचे तोमर म्हणाले. इतक्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे हे संकलन देशाच्या इतिहासात मैलाचा दगड म्हणून नोंदले जाईल, असेही ते पुढे म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेचा स्थापना दिवस 'संकल्प दिवस' म्हणून साजरा केला पाहिजे. यानिमित्ताने वर्षभराचे संकल्प करुन ते पुढील स्थापना दिनापर्यंत पूर्ण करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज हवामान बदलाचं मोठं आव्हान 

आयसीएआरची स्थापना होऊन 93 वर्षे झाली आहेत. आयसीएआरने 1929 मध्ये स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सुमारे 5 हजार 800 बियाणांचे वाण बाजारात आणले आहेत. 2014 पासून आतापर्यंतच्या आठ वर्षात त्यापैकी सुमारे 2 हजार जातींचा समावेश आहे. ही अतिशय महत्त्वाची कामगिरी आहे. यामध्ये बागायती, हवामानास अनुकूल आणि फोर्टिफाइड वाणांचे बियाणे समाविष्ट आहे. आज आपण हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देत आहोत.  वैज्ञानिकांसाठी ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. भारताच्या कृषी निर्यातीत आणखी सुधारणा व्हावी यासाठी आपल्याला या दिशेने एक रोडमॅप तयार करावा लागेल. त्याचे परिणाम देशासमोर मांडावे लागतील. यामध्ये सर्व कृषी विज्ञान केंद्र आणि आयसीएआर संस्थांच्या शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही तोमर म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget