एक्स्प्लोर

कापसावर बोंडअळी, वेचणीला मजूरही मिळेनात,हताश होत उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला

Cotton farmer: एकीकडे बोंडअळी दुसरीकडे वेचणीला मजूरही मिळत नसल्यानं आता शेतकरी हताश झाले आहेत.

Nandurbar: यंदा झालेला सरासरीपेक्षा अधिक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापसावर  बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. एकीकडे बोंडअळी दुसरीकडे वेचणीला मजूरही मिळत नसल्यानं आता शेतकरी हताश झाले आहेत. उभ्या कपाशीवर नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणून कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय.वेचणीसाठी मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव, मजूरही मिळेनात

कल्पेश भगवान पाटील यांनी शहादा तालुक्यातील करजई गावात  सहा एकरावर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. पाऊस जास्त झाल्याने कापसाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. आता यातून कसाबसे कपाशीचे पीक वाचले पण आता कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने कापूस पीक हातातून गेले आहे. तर दुसरीकडे मजूर टंचाईचा सामना ही शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गुलाबी बोंडअळी ही अतिशय नुकसानकारक कीड आहे. ती बोंडाच्या आत राहून उपजीविका करते, बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

पंचनामे केले पण नुकसान भरपाई नाहीच!

सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेत मात्र अजूनही भरपाई मिळाली नसल्याच्या शेतकरी कल्पेश पाटील सांगतात. अखेर हताश  होतं त्यांनी कापसाच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलाय.कापूस हातातून गेला असला तरी रब्बी हंगामातील उत्पन्न घेता येईल या अपेक्षेत शेतकरी दिसून येत आहेत.सरकारने अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून येत असून सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी हीच अपेक्षा असल्याचं शेतकरी सांगतायत.

अवकाळी पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता

लातूर जिल्ह्यात देखील अनेक भागात दोन दिवसांपूर्वी पावसानं हजेरी लावली. वातावरणात गारठा वाढला आहे. लातूर शहर आणि परिसर देवणी शहर आणि परिसर निलंगा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर असलेल्या लोकांची तारांबळ उडाली आहे. कव्हा हरंगुळ खोपेगाव सारोळा बाभळगाव या भागातही रिमझिम पावसाची हजेरी होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता दाट झाली आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात म्हणावा तसा गारवा जाणवत नव्हता. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget