एक्स्प्लोर

Maharashtra Rains : लातूरसह नाशिक सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी शेती पिकांना फटका

Maharashtra Rains: राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Maharashtra Rains : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत.   कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे. 


Maharashtra Rains :  लातूरसह नाशिक सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी शेती पिकांना फटका

नाशिक पाऊस

जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक सह जिल्हाभरात पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र काल रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहरासह मुंबई नाका, सीबीएस, पाथर्डी फाटा, गंगापूर नाका, गंगापूर रोड परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुढील एका तासातच शहरात तब्बल 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

दरम्यान एका तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने चालकांना वाहणे चालविणे कठीण झाले होते. तर शहर परिसरात म्हणजे नाशिक रोड, गिरणारे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. नाशिकसह राज्यातील काही भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 


Maharashtra Rains :  लातूरसह नाशिक सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी शेती पिकांना फटका

नागपूर विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

नागपूर विभागात जुलै महिन्यात सरासरी 360.10 मिलिमीटर पाऊस पडतो, यावर्षी प्रत्यक्षात 684.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 190 टक्के अधिक पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांचे, पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने अशा गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली असून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाला अहवाल सादर करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Satara Lok Sabha Elections : साताऱ्यात उदयनराजेंना उमेदवारी, शिवेंद्रराजे नाराजSanjay Gaikwad Full PC  : उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता भरला जात नाही - संजय गायकवाडNashik Lok Sabha Seat Sharing Conflicts : नाशिकच्या जागेवरुन महायुती-मविआमध्ये गुंताSadabhau Khot  : हातकणंगलेमधून सदाभाऊ खोत आग्रही;  उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
Embed widget