Lumpy Virus : वाढत्या थंडीचा शेतकऱ्यांसह पशुपालकांना देखील फटका, लम्पीमुळे ग्रासलेल्या जनावरांना थंडीमुळे विविध रोगांची लागण
Lumpy Virus :वाढत्या थंडीचा मात्र जनावरांना फटका बसला आहे. थंडीचा जोर वाढल्याने लम्पी आजाराने ग्रासलेल्या जनावरांना आता वेगवेगळ्या आजारांची लागण होत असल्याचं समोर आले आहे.
मुंबई: राज्यातील अनेक भागात गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झाली आहे. अगोदर लम्पीमुळे (Lumpy Virus) ग्रासलेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळ्या आजारांची लागण होताना दिसत आहे. जनावारांध्ये फूट अॅन्ड माऊथ डिसीज अर्थात तोंडखुरी आणि पायखुरी असे विषाणूजन्य आजार बळावत असल्याने, लम्पीसोबतच इतरही आजारांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे थंडीमुळे पालेभाज्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे.
बदलत्या हवामानामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. राज्यातील थंडीचा पारा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अतिथंडीचाही जनावरांवर परिणाम होताना दिसत आहे. परिणामी उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. वाढत्या थंडीमुळे गुरांना विविध आजारांचा समाना करावा लागत आहे.
पशुपालकांची चिंता वाढली
बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यात लम्पीने ग्रासलेल्या जनावरांना इतरही अनेक आजारांची लागण होत आहे. गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. या थंडीचा मात्र जनावरांना फटका बसला आहे. थंडीचा जोर वाढल्याने लम्पी आजाराने (Lumpy Virus) ग्रासलेल्या जनावरांना आता वेगवेगळ्या आजारांची लागण होत असल्याचं समोर आले आहे. जनावारांध्ये फूट अँड माऊथ डिसीज (Foot And Mouth disease) अर्थात तोंडखुरी आणि पायखुरी असे विषाणूजन्य आजार बाळावत असल्याने, लम्पीसोबतच इतरही आजारांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
थंडीमुळे पालेभाज्यांच्या पिकांचं मोठं नुकसान
भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) वाढत्या थंडीने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. थंडीमुळे पालेभाज्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतंय. तर दुसरीकडे पेरणी झालेल्या पिकांची वाढ थंडीमुळे खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागू शकतं. भंडारा जिल्ह्यात वाढलेल्या थंडीमुळे फुलकोबीसारख्या भाज्यांची पानं पिवळी पडू लागली आहेत. इतरही भाज्यांची तशीच अवस्था असल्यामुळे मुदतीच्या आधीच पिकं काढली जातायत. मात्र अशा भाज्यांना योग्य भाव मिळत नाहीय आणि ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. खरीप पिकाबरोबर रब्बी पिक ही धोक्यात आल्याच चित्र आहे . सातत्याने होणाऱ्या वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर मर रोगाची लागण झाली होती . आता घाटे आळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या चितेत भर घालणारा आहे
इतर महत्त्वाच्या बातम्या :