साखरेच्या उत्पादनात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट; निर्यातीवर केंद्र सरकारनं बंधन लावल्यानं कारखानदार अडचणीत
Export of Sugar: यंदा वातावरणातील बदलांमुळे शेतपिकांवर मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी साखरेच्या उत्पादनात जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी घट झाी
Export of Sugar: गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या वातावरण बदलांमुळे (Climate Change) शेतपिकांवर मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी सातत्यानं बदलणारं वातावरण आणि लांबलेला पाऊस (Rain Updates) यांमुळे अनेक पिकांवर परिणाम झाला आहे. तसेच, अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे, ऊस.
यंदा बदलतं वातावरण पाऊस (Rain Updates) काळ जास्त झाल्याने ऊसाची (Sugarcane) वाढ पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम साखरेचा उत्पादनावर (Sugar Production) होणार आहे. यावर्षी भारतामध्ये 20 ते 25 लाख टन साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. प्रति हेक्टर 15 ते 20 टन ऊसाचे उत्पादन कमी झाल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला (Sugar Export) केंद्र सरकारने बंधन लावली आहेत. या विषयावर एबीपी माझाने साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर (Jayprakash Dandegaonkar) यांच्यासोबत संवाद साधला.
गेल्या वर्षी इतकीच यावर्षी उसाची लागवड करण्यात आली होती. परंतु, यावर्षी साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. निसर्ग बदललाय, सततचा पाऊस आणि हवामानातील बदल यांमुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे हेक्टरी 15-20 टन साखर उत्पादन घटलं आहे. याचा परिणाम साखर 333 लाख टन किंवा त्यापेक्षाही कमी उत्पादन होऊ शकतं. गेल्या वर्षी हेच उत्पादन 357 लाख टन इतकं होतं. साखर उत्पादन जरी कमी झालं, तरी देशातील साखरेच्या दरांवर परिणाम होणार नाही. ऊस निर्यातीला मोठी मागणी आहे. परंतु, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधनं लादली आहेत. त्यामुळे आपली साखर जास्त निर्यात होणार नाही. देशात 275 लाख टन साखरेचा वापर इथेनॉलकडे 45 लाख टन साखरेचा वापर असं गृहीत धरलं तर देशात मुबलक साखर आहे.
उसाचे उत्पादन कमी होण्यामागची मुख्य कारण
प्रमुख कारण निसर्गात झालेले बदल सतत पाऊस राहिल्यानं शेतात पाणी साचून राहिले. परिणामी उसाची वाढ कमी झाली म्हणून एकरी उत्पादन कमी होत आहे. पहिल्यांदा असं झाल्यानं संशोधन सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील साखरेवर परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे भाव मागील तीन महिन्यापासून खूप वधारलेले होते. इतका भाव साखरेला कधीही मिळाला नव्हता, मार्चपासून ब्राझिलचे उत्पादन सुरू होईल. ते उत्पादन गृहीत धरल्यास जागतिक स्तरावर साखरेचा तुटवडा नाही, हे स्पष्ट होतं. त्यामुळे साखरेचे भाव फार काही वाढणार नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या नियमावलीचा फटका; सप्टेंबर, ऑक्टोबरचा मोबदला मिळेना