Sugar Production : भारत साखर क्षेत्रात 'आत्मनिर्भर', इतर देशांना मोठी निर्यात : केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन
साखर क्षेत्रात (sugar sector) भारत 'आत्मनिर्भर' असून, इतर देशांना साखर निर्यात करत असल्याचे मत केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन (Sadhvi Niranjan) यांनी व्यक्त केले.
Sugar Production : आता आपण साखर क्षेत्रात (sugar sector) 'आत्मनिर्भर' असून, इतर देशांना साखर निर्यात करत असल्याचे मत केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री साध्वी निरंजन (Sadhvi Niranjan) यांनी व्यक्त केले. गोव्यात आयोजीत करण्यात आलेल्या भारतीय साखर तंत्रज्ञ संघटनेच्या 80 व्या वार्षिक अधिवेशनात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारत सरकारची धोरणे अंमलात आणण्यासाठी साखर उद्योगाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले असल्याचंही त्यांनी सांगितले.
भारत आता आपण साखर क्षेत्रात आत्मनिर्भर असण्यासह इतर देशांनाही साखर निर्यात करत आहे. तसेच उत्पादकता सुधारण्यासाठी आणि त्याचे फायदे प्रत्येक भागधारकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला शेतापासून कारखान्यापर्यंतच्या स्तरावर काम करावं लागेल, असेही त्या म्हणाल्या. भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत भारताला विकसित देशांच्या दर्जाच्या नजीक आणण्यासाठी, भारत सरकार @ 2047 या विस्तृत आराखड्यावर काम करत आहे. हा आराखडा विविध आर्थिक क्षेत्रांसाठी विशिष्ट उद्दिष्टे निश्चित करेल अशी माहितीही यावेळी साध्वी निरंजन यांनी दिली. दरम्यान, साखर उद्योगाची भूमिका लक्षात घेता त्या दृष्टिकोनातून योजना तयार करणे आवश्यक आहे असल्याचे मत अन्न आणि सार्वजनिक वितरणचे सचिव सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले.
देश-विदेशातील 1 हजारहून अधिक प्रतिनिधींची हजेरी
या वार्षिक अधिवेशनाला देश-विदेशातील 1 हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. साखर आणि इथेनॉल संयंत्र यंत्रसामग्री, ऊस तोडणी उपकरणांचे उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या 78 कंपन्या आणि तंत्रज्ञान प्रदातेही या अधिवेशनातही सहभागी झाले होते. इथेनॉलचे महत्त्व लक्षात घेता, भारतीय साखर उद्योगाला जैव-ऊर्जेचे केंद्र म्हणून रुपांतरित करण्याचे मार्ग आणि माध्यमांवर चर्चा करण्यासाठी एक समर्पित सत्र आयोजित करण्यात आले होते.
या उद्घाटन सत्रादरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात, गोव्यात अधिवेशन आयोजित केल्याबद्दल भारतीय साखर तंत्रज्ञ संघटनेची प्रशंसा केली. हे अधिवेशन या क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि जुन्या साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रेरणा देईल, असे ते म्हणाले. साखर उद्योगाचा मोठ्या प्रमाणात कायापालट करुन सद्यस्थितीत ते व्यवहार्य बनवण्यात शास्त्रज्ञांच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तंत्रज्ञान हे अनेक समस्यांवर उपाय ठरणार आहे. साखर उद्योगाकडे या अनुषंगाने पुढचा दृष्टिकोन असायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: