Maharashtra Rain: येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
राज्याच्या इतर भागात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. राज्यात मान्सून दाखल झाला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. दरम्यान, येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain : मुंबईसह परिसरात जरी पाऊस पडत असला तरी राज्याच्या इतर भागात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. राज्यात मान्सून दाखल झाला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरु आहे. मुंबई आणि परिसरात जरी पाऊस पडत असला तरी अन्य ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. राज्यात मान्सून दाखल झाला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही. या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.
कृषी विभागाचं आवाहन
राज्याच्या काही भागात पावसानं चांगली हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. त्याठिकाणचे शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
दरम्यान, सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून म्हणजेचं आजपासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं आजपासून पुढच्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
