Amit shah : सर्व सहकारी समित्यांसाठी सरकारी ई-बाजाराचे दरवाजे खुले, सहकार क्षेत्रात पारदर्शकता येईल : अमित शाह
सहकाराच्या मदतीनं हातात कमी निधी असेल तरीही लोक एकत्र येऊन मोठमोठी कामे सहजतेने पार पाडू शकतात असे मत केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केलं.
Amit shah : सहकाराच्या मदतीनं हातात कमी निधी असेल तरीही लोक एकत्र येऊन मोठमोठी कामे सहजतेने पार पाडू शकतात असे मत केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केलं. स्वातंत्र्यानंतर या क्षेत्राकडं दुर्लक्ष झालं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ऐतिहासिक सुधारणा तसेच आधुनिकीकरणाच्या मदतीने या क्षेत्राच्या वाढीला वेग देत असल्याचे शाह म्हणाले. अमित शाह यांच्या हस्ते सहकारी संस्थाना जेम अर्थात सरकारी ई-मार्केट प्लेस (GeM) वर आणण्याची व्हर्च्युअल सुरुवात काल झाली. यावेळी ते बोलत होते. आता सर्व सहकारी समित्यांसाठी सरकारी ई-बाजाराचे दरवाजे खुले झाले आहेत.
सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी ई-मार्केट प्लेस उपयुक्त
सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी जेम पोर्टल म्हणजे ई-मार्केट प्लेस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पारदर्शकतेमध्ये वाढ झाल्यावर शेतकरी तसेच दूध उत्पादकांचा सहकारी समित्या आणि त्यांचे सदस्य यांच्यावरील विश्वास वृद्धिंगत होईल असेही शाह म्हणाले. केंद्रीय सहकार मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ तसेच सरकारी ई-बाजार उपक्रमाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योगमंत्री पीयूष गोयल हे देखील उपस्थित होते. 9 ऑगस्ट 1942 मध्ये गांधीजींनी इंग्रज सत्तेविरुद्ध 'भारत छोडो' आंदोलनाची सुरुवात केली होती. आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 9 ऑगस्टच्याच दिवशी आणखी एक महत्त्वाचे कार्य संपन्न होत आहे. देशभरातील सर्व सहकारी समित्यांसाठी सरकारी ई-बाजाराचे, जेमचे दरवाजे खुले झाले आहेत. सहकार क्षेत्रात अमर्याद संधी आहेत आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी सरकारी ई-बाजार पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरेल असे अमित शाह यांनी यावेळी सांगितेल.
सहकार क्षेत्राच्या विस्तारासाठी सुधारणा करणं आवश्यक
सहकाराचे मॉडेल हे असे मॉडेल आहे की ज्यामध्ये कमी पैशांमध्ये लोक एकत्र येऊन मोठ-मोठी कामे सहज करु शकतात, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. काळानुरुप कोणतीही व्यवस्था बदलली नाही तर ती कालबाह्य ठरते. सहकार क्षेत्राच्या विस्तारासाठी त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या देशातील सहकार व्यवस्था 115 वर्षे जुनी आहे. कायदेही खूप जुने आहेत, त्यात वेळोवेळी काही बदल झाले पण काळानुरुप आमूलाग्र बदल आणि आधुनिकीकरण झालेले नाही, असे ते म्हणाले. सहकार क्षेत्राला आता कोणीही दुय्यम लेखू शकत नाही. मात्र आपल्यालाही बदलाची सुरुवात करावी लागेल, पारदर्शकतेच्या दिशेने पुढे जावे लागेल आणि स्वतःला सज्ज करावे लागेल असेही शाह म्हणाले.
शेतकरी आणि दूध उत्पादकांचा सहकारी संस्थांवरील विश्वास वाढेल
सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी जेम (जीईएम) पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरेल. जेव्हा पारदर्शकता येईल तेव्हा शेतकरी आणि दूध उत्पादकांचा सहकारी संस्थांवरील आणि त्यांच्या सभासदांवरील विश्वास वाढेल, असे अमित शाह यांनी सांगितले. जेम (जीईएम) पोर्टल आणून मोदीजींनी सरकारी खरेदीत पारदर्शकता आणण्याचे काम केले आहे. ही एक नवीन प्रणाली आहे, सुरुवातीला काही प्रशासकीय समस्या असू शकतात परंतु कोणालाही त्याच्या हेतूवर शंका असता कामा नये , असे ते म्हणाले. सहकार क्षेत्रातील निवडणूक, भर्ती आणि खरेदी या तिन्ही क्षेत्रात पारदर्शकता आणणेही अत्यंत गरजेचे आहे. खरेदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जेम सारखे चांगले माध्यम असू शकत नाही, असे शाह यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: