एक्स्प्लोर

Sindhudurg News : तळकोकणात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत.

Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांच्या कळपाने शेती पिकांचे मोठं नुकासन केलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीसाठी तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, सध्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाच्या वतीनं केले जात आहेत. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. पावसाळा सुरु झाल्यापासून गवे भात, नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. गव्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही शेतकन्यांनी जमीन पडीक ठेवली आहे. तर काहींनी पडीक जमिनीत काजू, आंबा कलमांची लागवड केली केली आहे. मात्र, गव्यांनी या कलमांचीही नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या लोक वस्तीतील भात शेतीतही गव्यांचे दर्शन होत आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
 
शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा भातशेती आहे. यापलीकडे जाऊन शेतकरी काजू, आंबा बागाची शेती देखील शेतकरी करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून जंगल परिसराबरोबरच शेती, तसेच भर वस्तीतही गव्या रेड्यांकडून शेतीची नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासन दरबारी ओरड मारुनही काहीच हाती लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गव्यांची संख्या खूप वाढली असून सह्याद्री पट्ट्यातील आंबोली, दोडामार्ग तालुका, माणगाव खोरे, सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच गावांत गव्यांचे वास्तव्य दिसत आहे.

मोकळ्या कुरणातील गवत, झाडपाला, कोवळ्या फांद्या, कोवळे बांबू हे गव्याचे आवडीचे खाद्य आहे. खारट जमीन, खडक चाटायला त्याला आवडतात. त्यामुळं जंगलात ज्या ठिकाणी खारट जमीन, खडक असतात, तेथे त्याचा वावर जास्त असतो. मात्र, जिल्ह्यातील खासगी जंगलाचा विचार करता या ठिकाणी गव्याचे आवडते खाद्य नष्ट होत आले आहे. त्यामुळे त्याच्या अन्नाचा प्रश्न पुढे आला आहे. खासगी जंगलात पाणवठ्यांची सोय नसल्याने हा प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात आता जंगलाबाहेर शेतीकडे हळूहळू भरवस्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. जंगलातून गवा भरवस्तीपर्यंत येऊ लागला आहे. मात्र, त्यांची वाढती संख्या शेती बागायती नव्हे, तर भविष्यात मानवासाठीही धोकादायक ठरु शकते.

महत्त्वाच्या बातम्या:

Sindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली उपाययोजना?

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget