Food Wastage : जगभरात महागाई शिगेला, युरोपमध्ये मात्र अन्नाची मोठी नासाडी, संशोधनातून धक्कादायक माहिती
Food Wastage In Europe : एकीकडे जगात महागाई वाढत असताना दुसरीकडं युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी (Food Wastage) होत असल्याचं समोर आलं आहे.
![Food Wastage : जगभरात महागाई शिगेला, युरोपमध्ये मात्र अन्नाची मोठी नासाडी, संशोधनातून धक्कादायक माहिती Food Wastage In Europe Food Wastage doubled in europe shocking thing revealed in research report Food Wastage : जगभरात महागाई शिगेला, युरोपमध्ये मात्र अन्नाची मोठी नासाडी, संशोधनातून धक्कादायक माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/f1be28f77d7de7beec0720c22a87c1291663907847021339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Food Wastage In Europe : सध्या जगभरात महगाईचा (Inflation) भडका उडाला आहे. अनेक देशांमध्ये वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्यांचा कंबरडं मोडलं आहे. अशातच युरोपमधून (Europe) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे जगात महागाई वाढत असताना दुसरीकडं युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी (Food Wastage) होत असल्याचं समोर आलं आहे. युरोपमध्ये होत असलेली अन्नाची नासाडी ही त्याच्या आयातीपेक्षा जास्त होत आहे. 11.38 लाख कोटी रुपयांचे अन्न वाया जात असल्याचे संशोधनातून समोर आलं आहे.
युरोपमध्ये दरवर्षी 1 हजार 530 दशलक्ष टन अन्न वाया
सध्या युरोपमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आलं आहे. जगात महागाईचा भडका होत असताना ही माहिती समोर आली आहे. युरोपमध्ये दरवर्षी सुमारे 1 हजार 530 दशलक्ष टन अन्न वाया जात असल्याचे या संशोधनात म्हटलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम महागाईवर झाला आहे. या युद्धामुळं जगभरात महागाई वाढत आहे. तसेच वातावरणातील बदलामुळं देखील महागाईत वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी सांगितली आहे.
वाया जाणाऱ्या गव्हामध्ये युक्रेनच्या अर्धी लोकसंख्येला पोसली जाऊ शकते
युरोपमध्ये जेवढा गहू वाया जातो, तेवढ्या गव्हामध्ये युक्रेनच्या अर्धी लोकसंख्येला पोसली जाऊ शकते, असे मत अभ्यासकांनी नोंदवलं आहे. अन्नधान्याच्या उच्च किंमती आणि संकटाच्या काळात, इतके धान्य वाया घालवणे म्हणजे एक प्रचंड अराजकता निर्माण करण्यासारखं असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. संशोधनानुसार, 2030 पर्यंत ही अन्नाची नासाडी 50 टक्क्यांनी कमी करायचा आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. युरोपमधील 43 पर्यावरणीय संस्थांनी याला पाठिंबा दिला असल्याची माहिती देखील तज्ज्ञांनी दिली आहे.
सुमारे 20 टक्के अन्न उत्पादन वाया जात
युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) च्या म्हणण्यानुसार, युक्रेन आणि रशिया या दोन देशात सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात अन्नधान्याच्या किंमतीत सुमारे आठ टक्क्यांची वाढ झाली होती. गहू, मका आणि सोयाबीनच्या सध्याच्या किंमतींनी 2008 च्या जागतिक आर्थिक संकटाचा विक्रमही मोडला आहे. सध्या स्वस्त अन्नाचे युग संपले असल्याचे मत FAO माजी अर्थतज्ज्ञ अब्दोलरेझा अब्बासियन यांनी नोंदवले.
सुमारे 20 टक्के अन्न उत्पादन वाया जाते
संशोधनातील अहवालानुसार अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्याची किंमत ही 11.38 लाख कोटी रुपये आहे. सुमारे 6 टक्के हरितगृह वायू यातून वाया जात असल्याचेही अहवालात आढळून आले आहे. सुमारे 20 टक्के अन्न उत्पादन वाया जात आहे. 2030 पर्यंत, EU ने हे प्रमाण अर्धे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामुळे 4.7 दशलक्ष हेक्टर उत्पादनाची बचत होऊ शकते, असे अहवालात सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)