एक्स्प्लोर

Farmer Protest : शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकार कायदा का करत नाही ? नेमकी अडचण तरी काय?

Farmer Protest : शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी (Minimum Support Prices) , यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. शिवाय केंद्र सरकारने (Central government) आणलेली नवे कृषी कायदेही मागे घ्यावे लागले होते.

Farmer Protest : शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी (Minimum Support Prices) , यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. शिवाय केंद्र सरकारने (Central government) आणलेली नवे कृषी कायदेही मागे घ्यावे लागले होते. सरकारने कृषी कायदे मागे घेतले तेव्हा शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत मिळावी, अशी मागणी केली होती. याच मागणीवर पुन्हा एकदा पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने दिल्लीला चांगलाच घेराव घातलाय. मात्र, किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? आणि सरकार यासाठी कायदा का करत नाही? जाणून घेऊयात...

शेतकऱ्यांना शेती करताना फायदा व्हावा आणि नुकसानीचा सामना करावा लागू नये.यासाठी किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत आवश्यक असते. केंद्र सरकार अन्न-धान्यांची किमान किंमत ठरवू शकते. यालाच किमान आधारभूत किंमत म्हटले जाते. उदाहरण सांगायचे झाले तर शेतमालाची किंमत बाजारातील भावाच्या तुलनेत कमी असेल तर सरकार किमान आधारभूत किंमत देऊन ती खरेदी करते. जवळपास 60 वर्षांपूर्वी सरकारने अन्नधान्याची कमतरता जाणवू नये, यासाठी एमएसपीची सुरुवात केली होती. त्यामुळे सरकार थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करुन गरिबांना वाटत होते. 

शेतकऱ्यांना कशाची भीती?

तीन कृषी कायदे केंद्र सरकारने वापस घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, शेतकऱ्यांना कशाची भीती आहे जाणून घेऊयात? किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना 50 टक्के परतावा मिळावा या दृष्टीने ठरविले जाते. मात्र, असे होताना दिसत नाही. अनेकदा शेतकऱ्यांचा माल अतिशय कमी किंमतीत विकत घेतला जातो. सध्या याबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नाही. अशात शेतकरी त्यांच्या लढा कायदेशीर दृष्ट्याही देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयातही जाता येत नाही. जर हा कायदाच नाही, केवळ नियम आहे. तर सरकार किमान आधारभूत किंमत देणे. केव्हाही बंद करु शकते याची भिती शेतकऱ्यांना आहे. 

किमान आधारभूत किंमत दिल्यास शेतकऱ्यांना किती फायदा?

सरकार प्रत्येक पीकाला किमान आधारभूत किंमत देत नाही. सरकारकडून  केवळ 14 पिकांना किमान आधारभूत किंमत मोजण्यात येते. कृषी मंत्र्यांच्या समितीकडून या पीकांची निवड होते. हा एक विभाग आहे. ही कोणतीही संघटना नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा होईल, अशी दुरान्वये अपेक्षा ठेवता येत नाही.  ऑगस्ट 2014 मध्ये 10 वर्षांपूर्वी शांता कुमार समितने एक रिपोर्ट जारी केला होता. यानुसार देशात फक्त 6 टक्के शेतकरी आहेत. ज्यांना किमान आधारभूत किंमत मिळते. बिहारमध्ये तर एमएसपीवर शेतमालही खरेदी केला जात नाही. बिहारमधील अनेक शेतकरी आपला माल अतिशय कमी किमतीत विकताना दिसतात. 

शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर होऊ शकतात का?

शेतकरी संघटना एमएसपीसाठी आणि त्याच्या कायद्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल केंद्र सरकारला किमान आधारभूत किंमतीवर विकता येऊ शकेल. काही आकड्यानुसार, शेतकऱ्यांच्या मागण्या पटू शकतात. 2020 या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रातील उत्पन्न 40 लाख कोटींवर गेले होते. यामध्ये डेअरी, शेती, पशुपालन, यांसारख्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचा समावेश होता. तर फक्त शेतीच्या उत्पन्नाचा विचार केला तर हा आकडा 10 लाख कोटींवर जातो. यातील 24 पीकांचा एमएसपीमध्ये समावेश आहे.  

10 लाख कोटींचा बोजा 

2020 या आर्थिक वर्षात एकूण एमएसपीच्या खरेदीनुसार 2.5 लाख कोटी रुपये म्हणजेच कृषी क्षेत्रातील उत्पन्नाच्या 6.25 टक्के आहे. जर एमएसपीच्या गॅरंटीसाठी कायदा करण्यात आला तर सरकारवर 10 लाख कोटींचा अतिरिक्त भार पडेल. ही आकडेवारी तशी फार मोठी आहे. गेल्या 7 वर्षांपासून प्रत्येक वर्षाचा विचार केला तर  एवढी रक्कम भारतात पायाभूत सुविधांवर देखील खर्च करण्यात आलेली नाही. 2016 ते 2013 दरम्यान पायाभूत सुविधांवरिल खर्च काढला तर तो 67 लाख कोटी रुपये इतका आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

PM Narendra Modi : मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पीएम मोदींकडून तिसऱ्या टर्मबाबत अबूधाबीतून स्पष्ट संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
Devendra Fadnavis : 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत, चीन देखील भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मोदींमुळे आम्ही जिवंत; 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत : फडणवीस
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM  :27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPrakash Ambedkar : विधानसभेला काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात - प्रकाश आंबेडकरOnion Export : 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णयAjit Pawar Full Speech Pune Ambegaon :आधी ताईंची नक्कल,मग खरमरीत टीका;अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
Devendra Fadnavis : 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत, चीन देखील भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मोदींमुळे आम्ही जिवंत; 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत : फडणवीस
Telly Masala : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Salman Khan House Firing :  टार्गेट मुंबईतील सलमान खान, प्रॅक्टिस बिहारमध्ये!आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
टार्गेट मुंबईतील सलमान खान, प्रॅक्टिस बिहारमध्ये!आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
पंकजा मुंडेंनी नाशिक लोकसभेबाबत वक्तव्य घेतलं मागे, म्हणाल्या, नासमझ लोकांनी वेगळाच अर्थ लावला; मनातली सल बोलून दाखवत कोणावर साधला निशाणा?
पंकजा मुंडेंनी नाशिक लोकसभेबाबत वक्तव्य घेतलं मागे, म्हणाल्या, नासमझ लोकांनी वेगळाच अर्थ लावला; मनातली सल बोलून दाखवत कोणावर साधला निशाणा?
Embed widget