एक्स्प्लोर

PM Narendra Modi : मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पीएम मोदींकडून तिसऱ्या टर्मबाबत अबूधाबीतून स्पष्ट संकेत

PM Narendra Modi : पीएम मोदी म्हणाले, युक्रेन, सुडानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे आणले. विदेशातील भारतीयांसाठीही सरकार दिवसरात्र काम करते. आज भारताला जग विश्वबंधू म्हणून ओळखते. आज तुम्ही मेहनत करत आहात. अबूधाबीमध्ये भारतीयांनी इतिहास रचला. युईएच्या विकासात भारताचा मोठा वाटा आहे.

PM Narendra Modi : "मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असते.  तिसऱ्या टर्ममध्ये मी भारताला तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) मोठी वाढ होत आहे. कोठेही संकट आले तर सर्वांत लवकर पोहोचणऱ्या देशांमध्ये भारताचे नाव असते", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. ते अबूधाबीतील 'अहलान मोदी' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हजारो भारतीय उपस्थित होते. 

भारताला जग विश्वबंधू म्हणून ओळखते

पीएम मोदी म्हणाले, युक्रेन, सुडानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे आणले. विदेशातील भारतीयांसाठीही सरकार दिवसरात्र काम करते. आज भारताला जग विश्वबंधू म्हणून ओळखते. आज तुम्ही मेहनत करत आहात. अबूधाबीमध्ये भारतीयांनी इतिहास रचला. युईएच्या विकासात भारताचा मोठा वाटा आहे. एकमेंकांच्या विकासात दोन्हीही देशांनी एकमेंकांना सहाय्य केले असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. यावेळी पीएम मोदींनी 'सीबीएसई'चे नवे कार्यालय युएईमध्ये असेल अशी घोषणाही केली आहे. 

पीएम मोदींकडून "भारत माता की जय" च्या घोषणा 

पीएम मोदींनी अबूधाबीतील या कार्यक्रमात "भारत माता की जय" च्या जोरदार घोषणा दिल्या. शिवाय भारतात सुरु असलेल्या विकासाचा मोदींनी पाढाच वाचला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पीएम मोदी लोकांची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्यामध्ये पोहोचले. 

पीएम मोदींकडून 2015 च्या आठवणींना उजाळा

मला 2015 ची पहिली यात्रा आठवते. मी केंद्र सरकारमध्ये सत्तेत येऊन फार कालावधी झाला नव्हता. 2-3 दशकानंतर भारतीय पंतप्रधान इथे आला होता. माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणही नवे होते. तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला होता. तो सत्कार केवळ माझा नव्हता तर 140 कोटी भारतीयांचा होता. युएईतील प्रत्येक भारतीयाचा तो सत्कार होता. तो एक दिवस होता त्यानंतर आजचा एक दिवस आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मी सातव्यांदा इथे आलोय,असे म्हणत पीएम मोदींनी 2015 च्या आठवणींना उजाळा दिला. 

'अबूधाबीत एका मंदिरासाठी प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी क्षणार्धात होकार दिला'

माझे भाग्य आहे की, युएईने त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. हा केवळ माझाच सन्मान नाही. तर संपूर्ण भारत देशाचा सन्मान आहेत. आजही मी जेव्हा युएईच्या प्रमुखांना भेटतो तेव्हा ते भारतीयांचे कौतुक करतात. मी तुमच्याप्रती असलेले प्रेम अनुभवत असतो. मी अबूधाबीत एका मंदिरात प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी क्षणार्धात होकार दिला. ज्या जमीनीवर तुम्ही रेष ओढचाल ती जमीन मी तुम्हाला देऊन टाकेन, असे ते मला म्हणाले, असेही मोदींनी स्पष्ट केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

PM Narendra Modi : अबूधाबीतील मंदिराच्या प्रस्तावासाठी क्षणार्धात होकार, भारत -युएई दोस्ती जिंदाबाद; पीएम मोदींची अबूधाबीतून घोषणाबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget