Onion News : कांद्याच्या दरात चढ-उतार सुरुच, सरासरी मिळतोय 'एवढा' दर
दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. दोन दिवसांपूर्वी कांद्याचे वाढलेले भाव आज मात्र ढासळले आहेत.
Agriculture news : सध्या कांद्याच्या भावात चढ-उतार सुरुच आहे. दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. दोन दिवसांपूर्वी कांद्याचे वाढलेले भाव आज मात्र ढासळले आहेत. कांद्याला सरासरी 3 हजार 100 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी 3 हजार 300 रुपयापर्यंतचा प्रती क्विंटल असा चढा भाव मिळत होता. आज मात्र, या दरात घसरण झाली आहे.
आज कांद्याच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याला कमीत कमी 2 हजार 500 ते सरासरी 3 हजार 100 रुपयांपर्यंत आज भाव मिळत आहे. केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडी यामुळं व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे. यामुळं कांद्याचे दर खाली आल्याचे बोलले जात आहे.
दर घसरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली
दरम्यान, बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानं चाळीमध्ये थोडाफार शिल्लक असलेला उन्हाळ कांद्याला जास्तीचा भाव मिळेल ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दोनच दिवसात भाव पुन्हा कोसळू लागल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. यापूर्वी कांद्याचे झालेले नुकसान बघता, कांद्याला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव मिळाला तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. दरम्यान, दसऱ्याला बाजारात दाखल होणारा लाल कांदा अजूनही बाजारात येण्याची चिन्हे दिसत नसल्यानं भविष्यात कांदा टंचाई निर्माण होईल असे चित्र दिसत आहे.
नुकतेच व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव केले होते बंद
दरम्यान, नुकताच कांद्याच्या निर्यात शुल्कावरुन नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अनेक दिवस बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करुन विक्री रेशन दुकानातून करण्यात यावी. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या व्यापारावर सरसकट 5 टक्के सबसिडी आणि देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट 50 टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी. कांद्याचे भाव वाढल्यावर व्यापाऱ्यांवर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून धाडी टाकल्या जातात, हिशोब तपासणी केली जाते, ती चौकशी बाजारभाव कमी असताना करावी बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करु नये, बाजार समितीने आकारलेली मार्केट फीचा दर प्रति शेकडा 100 रुपयास 1 रुपयाऐवजी 100 रुपयास 0.50 पैसे या दराने करण्यात यावा. आडतीचे दर संपूर्ण भारतात एकच असावे, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामध्ये कांदा लिलाव सुरु, मागील तेरा दिवसांत काय काय घडल?