एक्स्प्लोर

Agriculture News : PM किसान योजनेचं नवीन अॅप हे आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम उदाहरण : कृषीमंत्री 

Agriculture News : फेस ऑथेंटिकेशन असलेल्या प्रधानमंत्री किसान मोबाईल अॅपचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.

Agriculture News : फेस ऑथेंटिकेशन असलेल्या प्रधानमंत्री किसान मोबाईल अॅपचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी केले. या अॅपचे चेहऱ्याद्वारे ओळख प्रमाणित करण्याचे वैशिष्ट्य आहे. किसान सन्मान निधीच्या नाविन्यपूर्ण योजना आणि तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना सर्वार्थाने फायदा झाल्याच तोमर म्हणाले. 

नवीन अॅप आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम उदाहरण  

शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पाठबळ देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजनेअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अॅपमध्ये वापरण्यात आलेले चेहरा पडताळणीचे वैशिष्ट्य हे आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे तोमर म्हणाले. या सुविधेमुळं ओटीपी (वन टाईम पासवर्ड) किंवा बोटांच्या ठशांशिवाय, चेहरा स्कॅन करुन शेतकरी दूरस्थपणे ई-केवायसी (नो युवर कस्टमर) पूर्ण करु शकतात. इतर 100 शेतकऱ्यांना त्यांच्या घरी ई-केवायसी करण्यास मदत करु शकतात. ई-केवायसी अनिवार्य करण्याची गरज ओळखून, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांची ई-केवायसी करता येईल अशी तरतूद केली आहे. त्यामुळं प्रत्येक अधिकारी 500 शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करु शकेल असेही तोमर म्हणाले.

आता डेटा पडताळणीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची एक अतिशय व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांनी त्यांची भूमिका परिपूर्णपणे निभावली आहे. त्यामुळे केवायसीनंतर 8.5 कोटी शेतकऱ्यांसाठी योजनेचा हप्ता भरण्याच्या स्थितीत आहोत. या व्यासपीठाचा जितका अधिक वापर होईल तितकी ती सुविधा पीएम-किसानसाठी उपयुक्त ठरेल असे तोमर म्हणाले. शेतकऱ्यांना कोणताही लाभ द्यायचा असेल तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारकडे संपूण माहिती उपलब्ध असेल. त्यामुळं डेटा पडताळणीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे तोमर यांनी सांगितले.

सरकारने राज्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या

पीएम-किसान ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे या योजनेचा लाभ केंद्र सरकार कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांना देत आहे. आज केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देणे शक्य झाले आहे. अतिशय महत्त्वाची कामगिरी असलेल्या या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीबाबत कोणीही शंका घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र सरकारने हे अॅप विकसित केल्यामुळे काम अधिक सोपे झाले आहे. केंद्र सरकारने राज्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आता राज्यांनी अधिक वेगाने काम केल्यास सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून निर्धारित लक्ष्य गाठता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2.42 लाख कोटी रुपये जमा

कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाचा फायदा होत असून या अॅपच्या नवीन सुविधेमुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले. पीएम किसान ही जगातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनांपैकी एक आहे. आधारशी जोडलेल्या बँक खात्यांद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये थेट हस्तांतरित केले जातात. आत्तापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2.42 लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. त्या शेतकऱ्यांपैकी 3 कोटींहून अधिक महिला आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Kisan Samman Nidhi : कधी जमा होणार PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता? कागदपत्रांची पूर्तता करा अन्यथा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget