PM Kisan Samman Nidhi : कधी जमा होणार PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता? कागदपत्रांची पूर्तता करा अन्यथा...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) 14 वा हप्ता कधी जमा होणार याची सध्या चर्चा सुरु आहे.
PM Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) 14 वा हप्ता कधी जमा होणार याची सध्या चर्चा सुरु आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केली नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी आधार कार्ड अपडेट केले नाही, त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही, त्या शेतकऱ्यांनी 23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. जे शेतकरी आधीच किसान सन्मान निधी योजनेशी निगडीत आहेत आणि त्यांचे ईकेवायसी पूर्ण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी पूर्तता करणं गरजेचं आहे. यासोबतच या योजनेत नुकतेच सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी देखील ई केवायसी करणे बंधनकारक आहे.
उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील 42 हजार शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी बंद होऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत, त्यांच्याकडे 23 जूनपर्यंत वेळ आहे. ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना या महिन्यातच हप्ता मिळू शकेल.
27 फेब्रुवारीला मिळाला होता 13 वा हप्ता
गेल्या वेळी 27 फेब्रुवारी रोजी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला होता. त्यामुळं केंद्र सरकारकडे 14 वा हप्ता जारी करण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार 14 व्या हप्त्याचे पैसे जून ते जुलै दरम्यान कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते. याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये 14 वा हत्पा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कशी कराल ऑनलाइन ekyc
जे शेतकरी इंटरनेट माध्यमांचा वापर करतात किंवा त्यांना ऑनलाइन पोर्टलचे थोडेसे ज्ञान आहे, ते स्वतःही ऑनलाइन माध्यमातून केवायसी करु शकतात.
1) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2) या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
4) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.
महत्त्वाच्या बातम्या: