केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
डीएपी खतांच्या किमतीत भूराजकीय परिस्थितीमुळे अस्थिरता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर वाढत्या किमतींचा ताण पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
DAP fertilizer subsidy: शेतकऱ्यांना आता परवडणाऱ्या दरात डीएपी खतं उपलब्ध होणार असून केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएपी खतांसाठी 3 हजार 850 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना डीएपी खताची एक बॅग 1350 रुपयांना मिळणार आहे. डीअमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी खतांची किरकोळ किंमत प्रति 50 किलोसाठी 1350 रुपये कायम ठेवण्यासाठी 31 डिसेंबर नंतरही अतिरिक्त अनुदान सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हा निर्णय झाला. दरम्यान आता दोन पीकविमा योजनांनाही मुदतवाढ देण्यात आली असून प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि RWBCIS या दोन योजना 2025-26 वर्षांपर्यंत आमलात आणल्या जाणार आहेत.
या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 3 हजार 850 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असून गेल्यावर्षीपेक्षा हा भार 1 हजार 125 कोटी रुपयांहून अधिक राहणार आहे.मागील वर्षी सरकारी तिजोरीवर विशेष अनुदान पॅकेजनंतर 2 हजार 625 रुपयांचा बोजा होता.
नव्या वर्षातील पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी
केंद्र सरकारचा नव्या वर्षातील पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी असल्याचं बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.केंद्रीय मंत्रिमंडळाने पीकविमा योजनेला मुदतवाढ दिली असून डीएपी खताच्या सबसिडीत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खतं मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. डीएपीवरील एनबीएस सबसिडीच्या प्रतिटन 3500 रुपयांपेक्षा अधिक वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना डीएपी खत 1350 रुपये प्रतिबॅग
गेल्यावर्षी केंद्र सरकारने 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रतिटन 3500 दराने डीपपी खतांसाठी मर्यादित स्वरुपातले अनुदान पॅकेज जाहीर केले होते. यात एनबीसी योजनेशिवाय हे अनुदान अतिरिक्त स्वरुपात देण्यात आले होते. डीएपी खतासाठी मंजूर करण्यात आलेलं हे अनुदान जानेवारी 2025 पासून पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आला. यामुळे डीएपी खत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना डीएपी खत 1350 रुपये प्रतिबॅग या दरानेच यापुढे मिळत राहणार आहे. यात अतिरिक्त भार केंद्र सरकार उचलणार आहे.डीएपी खतांच्या किमतीत भूराजकीय परिस्थितीमुळे अस्थिरता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर वाढत्या किमतींचा ताण पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने 28 प्रकारची फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवरही सबसिडी दिली असून ही सबसिडी 1 एप्रिल 2010 पासून लागू असलेलया एनबीएस योजनेतून देण्यात येणार आहे.
हेही वाचा: