एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ,  मंत्री जयकुमार रावलांची घोषणा 

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.

Soybean purchase : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, उपसचिव संतोष देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार 

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजेच 6 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. आता सोयाबीनच्या खरेदीसाठी 6 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, अशी महिती देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

सोयाबीनची खरेदी 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू 

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख 34 हजार 331 मेट्रिक टन एव्हढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ 7 हजार 400 क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या 561 खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत 6 लाख 69 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

पणन विभागामार्फत शेतकरी हिताचे धोरण आखण्यात येणार

शेतकऱ्यांना हमी भाव, तर ग्राहकांना रास्त दरात माल मिळाला पाहिजे यासाठी विभागाच्या माध्यमातून यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती असली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याअंतर्गत आदिवासी भागातील तालुक्यांवर भर देण्यात येईल, या भागात शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. पणन विभागामार्फत शेतकरी हिताचे धोरण आखण्यात येणार आहे. सोयाबीन, धान, कापूस यासारख्या पिकांना हमीभाव मिळवून देण्यासह कांद्यासारख्या नाशवंत पिकांना रास्त भाव मिळण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. त्यासाठी जगातील उत्तम बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या राज्यात वापर करण्यात येणार आहे.  बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यासह त्यांचे बळकटीकरण केले जाईल, अशी ग्वाही श्री. रावल यांनी दिली.

ज्यात शीतगृहांची उभारणी, गोदामांची निर्मिती- गाव तेथे गोदाम उभारण्यावर भर

नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट केला जाणार आहे. आशियातील अग्रेसर बाजार समिती म्हणून तिचा लौकिक होण्यासाठी जगातील उत्तमोत्तम व्यवस्था याठिकाणी राबविण्यात येणार आहे. शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यासारख्या सर्व संबंधित घटकांचा विचार केला जाणार आहे, असा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात शीतगृहांची उभारणी, गोदामांची निर्मिती- गाव तेथे गोदाम, माथाडी कामगार कायदा, शेतमालांची आयात-निर्यात, बाजार समित्यांना मिळणारा सेस, राज्यातील पीक पद्धती, दांगट समितीचा अहवाल, बाजार समिती सभापतींची परिषद यासारख्या बाबींचाही मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी आढावा घेतला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep kshirsagar On Walmik Karad : वाल्मिक कराड दोषी नव्हता मग फरार का झाला?Prajakta Mali on Suresh Dhus : सुरेश धसांनी माफी मागितली, प्राजक्ता माळीकडून प्रकरणावर पडदाWalmik Karad : CID च्या लिफ्टमध्ये जाताच मीडियासमोर हात जोडलेSuresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Nanded : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Embed widget