IPL 2022: 'मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडं कपडे नव्हते, टॉवेलवर दोन-तीन दिवस काढले' रोव्हमन पॉवेलनं ऐकवला तो किस्सा
Delhi Capitals Podcast: दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज रोव्हमन पॉवेलनं (Rovman Powell) त्याच्या फ्रँचायझीच्या पॉडकास्ट शोमध्ये स्वतःशी संबंधित अनेक किस्से सांगितलं आहेत.
Delhi Capitals Podcast: दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज रोव्हमन पॉवेलनं (Rovman Powell) त्याच्या फ्रँचायझीच्या पॉडकास्ट शोमध्ये स्वतःशी संबंधित अनेक किस्से सांगितलं आहेत. यामध्ये त्याच्या गरिबीशी संबंधित आहेत. तर, पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर त्याच्यासोबत घडलेल्या गंमतीशीर गोष्टींचाही यात समावेश आहे.
पॉवेल आयपीएल खेळण्यासाठी मुंबईत पोहचला तेव्हा त्याला काही दिवस टॉवेल गुंडाळून काढावे लागले. "मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला सांगण्यात आले की, एअरलाइन्सकडे माझी एकही बॅग नाही. माझ्याकडे फक्त माझी हँडबॅग होती. माझ्याकडं दुसरे कोणतेही कपडे नव्हते. ज्यामुळं मला माझ्या हॉटेलच्या खोलीत टॉवेल गुंडाळून दोन-तीन दिवस काढावे लागले. या काळात जर कोणी माझ्या खोलीचा दरवाजा कोणी ठोठावला तर मी दाराच्या मागं उभा राहून त्यांच्याशी बोलायचो.
रोव्हमन पॉवेल दमदार कामगिरी
रोव्हमन पॉवेलनं यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत 161 च्या स्ट्राईक रेटनं 205 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. परंतु, आता तडाखेबाज फलंदाजी करत तो आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देत आहे.
रोव्हमन पॉवेल घरची परिस्थिती हलाकीची होती
रोव्हमन पॉवेल हा अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे. ते एका टीन शेडमधील घरात राहत होते. जिथे पावसाळ्यात छतावरून पाणी टपकायचं. अनेक वेळा घरात खायला काहीच नव्हतं. त्याच्या आईनं त्याला कष्टानं शिकवलं.
...तर मी सैनिक झालो असतो
आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना पॉवेल म्हणाला की, "मी एका छोट्या गावातून आलो आहे. जिथे बहुतांश कुटुंबांसाठी शेती हाच मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. क्रिकेट आणि शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचं माझे लहानपणापासूनचं स्वप्न होतं. क्रिकेटनं आतापर्यंत मला चांगली साथ दिली आहे. मी क्रिकेटर झालो नसतो तर सैनिक झालो असतो. क्रिकेटपटू होण्यापूर्वी मी सैनिक होणार होतो."
हे देखील वाचा-