LSG vs GT: शुभमन गिलचा पराक्रम, सचिनच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी; आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदाचं असं घडलं
LSG vs GT: लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी आयपीएल 2022 चा 57 वा सामना खेळण्यात आला.
![LSG vs GT: शुभमन गिलचा पराक्रम, सचिनच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी; आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदाचं असं घडलं Shubhaman Gill's equals Sachin Tendulkar's unique record; This is the second time this has happened in the history of IPL LSG vs GT: शुभमन गिलचा पराक्रम, सचिनच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी; आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदाचं असं घडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/11/5df05c98af81c348714cbdeb6d648f24_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
LSG vs GT: लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी आयपीएल 2022 चा 57 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात गुजरातच्या संघानं 62 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं आहे. या सामन्यात अखेरपर्यंत गुजरातकडून लढणाऱ्या शुभमन गिलला ( Shubhaman Gill) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. एवढेच नव्हेतर, या सामन्यात त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तसेच तो गुजरातकडून सर्वाधिक करणार खेळाडू ठरला आहे. शुभमन गिलनं मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 49 चेंडूत 63 धावा केल्या. या डावात त्याने 7 चौकार मारले आणि संपूर्ण 20 षटके क्रीजवर राहिला. आयपीएलच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या खेळाडूने संपूर्ण 20 षटके फलंदाजी केली आणि एकही षटकार मारला नाही. शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकरनं ही कामगिरी केली होती. सचिन तेंडूलकरनं 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अशी कामगिरी केली होती. आता शुभमन गिलनं 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
शुभमन गिलची दमदार कामगिरी
शुभमन गिलनं या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यात जवळपास 35 च्या सरासरीनं 384 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. गिलनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 40 चौकार, 9 षटकार मारले आहेत.
शुभमन गिलची डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी
आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत शुभमन गिलनं डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली. दोघांनी या हंगामात चार- चार शतके केली आहेत. या यादीत राजस्थानचा आक्रमक फलंदाज जोस बटलर तीन अर्धशतक आणि तीन शतकासह यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)