Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
अंजली दमानिया यांनी आज बीडमध्ये निघत असलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटलं आहे. मुंडे यांना मंत्रीपद सोडायला भाग पाडत नाही तोपर्यंत ठिय्या देत राहू असेही त्यांनी म्हटलं आहे
Anjali Damania : शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचे अनेक कारनामे पाठीशी घातल्याचं म्हटलं होतं. त्याच प्रवृत्ती वाल्मिक करांडासारख्या व्यक्तींना मोठं करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया देणार असल्याचा एल्गार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी आज बीडमध्ये निघत असलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडायला भाग पाडत नाही तोपर्यंत ठिय्या देत राहू असेही त्यांनी म्हटलं आहे.
संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या
दरम्यान, दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पोलिसांनी पकडले नसलेल्या तीन आरोपींबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केला आहे. याबाबत मला फोन आल्याचा दावा त्यांनी केला. ही माहिती आपण पोलिसांना दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजिनामा अजूनही का घेत नाहीत? असा सवालही दमानिया यांनी केला. दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 20 दिवस उलटले, पण अजूनही अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही. या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मार्चा सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या