Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Anjali Damania Meet Santosh Deshmukh Family : अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेतली.
Anjali Damania Meet Santosh Deshmukh Family : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळतं नाही तो पर्यंत इथंच राहणार असल्याचे म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी (Santosh Deshmukh Family) बोलताना म्हटले की, जो पर्यंत न्याय मिळतं नाही तो पर्यंत इथंच राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे आपण ठिय्या आंदोलन करू. मी मागच्या शनिवारी येणार होते. पण, माझ्या आईची तब्येत खराब होती. जे झालाय ते अत्यंत धक्कायदायक आहे. मी आजच्या मोर्चात येणार नाही, तो राजकीय ड्रामा आहे, असे त्यांनी म्हटले.
अंजली दमानियांनी ऐकवली 'ती' कॉल रेकॉर्डिंग
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात फोन आल्याचा दावा देखील अंजली दमानियांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना तीन बॉडी मिळाल्या आहेत, अशी कॉल रेकॉर्डिंगच ऐकवली.
कॉल रेकॉर्डची खात्री केली पाहिजे : धनंजय देशमुख
यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) म्हणाले की, या कॉल रेकॉर्डची खात्री केली पाहिजे. आम्ही सामाजिक कामात होतो, लोकांची आम्हाला साथ आहे. माणूस म्हणून लोकं आमच्या सोबत आहेत. जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या सोबत राहा, अशी विनंती धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांच्याकडे केली. नवीन पोलीस अधीक्षक चांगलं काम करतायत, त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलंय. लोकांनी जी साथ दिलीय, त्यामुळे आम्ही उभं राहू शकलो. अन्यथा हे शक्य नव्हतं, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या