OTT Upcoming Release 2025: अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
OTT Upcoming Release 2025: 2025 वर्ष सरणार आहे आणि काही दिवसांनी नवं वर्ष 2025 येणार आहे. यासोबतच ओटीटीवर अनेक उत्तम वेब सीरिज आणि चित्रपटही प्रदर्शित केले जातील. ज्यामध्ये फक्त एन्टरटेन्मेट आणि एन्टरटेन्मेट असेल. OTT वर 2025 मध्ये कोणत्या मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
OTT Upcoming Release 2025: नवं वर्ष 2025 च्या आगमनासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. प्रत्येकजण नव्या वर्षाची आतुरतेनं वाट पाहत असतो. सिने जगताच्या दृष्टिकोनातून येणारं वर्ष आणखी खास असणार आहे, कारण मोठ्या पडद्याव्यतिरिक्त, अनेक बहुप्रतिक्षित वेब सिरीज आणि चित्रपट 2025 मध्ये OTT प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन स्ट्रीम केले जातील.
जाणून घेऊयात, पुढील वर्षी OTT वर प्रदर्शित होणाऱ्या आगामी मालिका आणि चित्रपटांची यादी पाहुयात...
डोन्ट डाई (Don't Die)
OTT प्लॅटफॉर्म Netflix अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती ब्रायन जॉन्सन यांच्या जीवनावर डोंट डाय-मॅन हू वॉन्ट्स लिव्ह फॉरएव्हर ही डॉक्युमेंट्री फिल्म घेऊन येत आहे. जी नवं वर्ष 2025 च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच, 1 जानेवारीपासून Netflix वर प्रदर्शित होईल.
पाताल लोक 2 (Paatal Lok 2)
2020 मध्ये कोरोना महामारीमुळे देश लॉकडाऊनमध्ये होता. त्यावेळी OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर पाताल लोक ही वेब सिरीज रिलीज झाली होती. जयदीप अहलावत अभिनीत या क्राईम थ्रिलर वेब सीरिजचा दुसरा सीझन 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी याची घोषणा केली आहे. असं मानलं जातं की, ते जानेवारी 2025 मध्ये प्राईम व्हिडीओवर रिलीज केला जाईल.
नाईट एजेंट सीजन 2 (Night Agent 2)
हॉलिवूड सुपरस्टार पीटर सदरलँड स्टारर स्पाय थ्रिलर वेब सीरिज नाईट एजंटचा दुसरा सीझन रिलीजसाठी सज्ज आहे. त्याची अधिकृत घोषणाही निर्मात्यांनी अलीकडेच केली आहे. नाईट एजंट 2 23 जानेवारी 2025 रोजी Netflix वर प्रदर्शित होईल.
ठुकरा के मेरा प्यार 2 (Thukra Ke Mera Pyaar 2)
2024 च्या अखेरीस, डिस्ने प्लस हॉटस्टार स्पेशल वेब सिरीज 'ठुकरा के मेरा प्यार'नं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. धवन ठाकूर आणि संचिता दास अभिनीत या सीरिजचा सीझन 2 नव्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.
द फॅमिली मॅन सीजन 3 (The Family Man Season 3)
राज आणि डीके या दिग्दर्शक जोडीनं द फॅमिली मॅन या वेब सीरिजद्वारे OTT वर चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मनोज बाजपेयी स्टारर या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन रिलीज झाले आहेत आणि दोन्ही यशस्वी झाले आहेत. त्यामुळे नव्या वर्षात OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर फॅमिली मॅन सीझन 3 पाहायला मिळेल, अशी अपेक्षा सर्व चाहत्यांची आहे.
प्रीतम पेडरो (Pritam Pedro)
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी वेब सीरिजच्या दुनियेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विक्रांत मेस्सी आणि अर्शद वारसी अभिनीत ही क्राईम थ्रिलर सीरिज 2025 मध्ये OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित केली जाऊ शकते.
स्ट्रिंजर थिंग्स 5 (Strangers Things 5)
हॉलिवूडची लोकप्रिय वेब सिरीज स्ट्रिंजर्स थिंग्ज सीझन 5 ची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सनं केली आहे. काल्पनिक जगाचा शेवटचा अध्याय ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात 2025 मध्ये रिलीज होऊ शकतो. या मालिकेच्या शेवटच्या सीझनची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :