भारताचे 66 वर्षीय माजी क्रिकेटपटू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारी पत्नी आहे 28 वर्षांनी लहान
अरुण लाल (Arun Lal) यांनी भारतासाठी 12 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांची भावी पत्नी बुलबुल साहा ही 38 वर्षांची आहे.
![भारताचे 66 वर्षीय माजी क्रिकेटपटू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारी पत्नी आहे 28 वर्षांनी लहान former indian cricketer arun lal will marry 28 years younger bulbul saha भारताचे 66 वर्षीय माजी क्रिकेटपटू दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारी पत्नी आहे 28 वर्षांनी लहान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/40e6e10ebf6f394511d781bc1c61d298_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या वर्षी दुसरे लग्न करणार आहेत. अरुण लाल यांनी भारतासाठी 12 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांची भावी पत्नी बुलबुल साहा ही 38 वर्षांची आहे. दोघांच्या वयात 28 वर्षांचा फरक आहे. अरुण लाल आणि बुलबुल 2 मे रोजी कोलकाता येथे लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरुण लाल आणि बुलबुल हे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अरुण लाल यांनी त्यांची पहिली पत्नी रीना यांना घटस्फोट दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रीना बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना या लग्नाबद्दल माहिती आहे. अरुण लाल यांच्या दुसऱ्या लग्नामुळे रीना खूप खूश आहेत. अरूण लाल हे बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांव्यतिरिक्त फक्त अरुण लाल आणि बुलबुलचे जवळचे मित्र या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
कर्करोगावर मात करणाऱ्या अरुण लाल यांच्या प्रशिक्षणाखाली बंगालचा संघ 2020 मध्ये रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तब्बल 13 वर्षांनंतर जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित करण्यात संघाला यश आले. बंगालने चालू मोसमात सलग तीन सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. आयपीएलनंतर रणजी ट्रॉफीचे उपांत्यपूर्व सामने खेळवले जातील.
अरुण लाल यांनी 16 कसोटी सामन्यात सहा अर्धशतकांच्या मदतीने 729 धावा केल्या होत्या. तर त्यांनी 13 वनडे सामन्यांत 122 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)