एक्स्प्लोर

Sanju Samson : दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, संजू सॅमसन दुखापतीमुळे मालिकेबाहेर, 'या' युवा खेळाडूला मिळाली संधी

IND vs SL : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी पंजाब संघाच्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे.

India vs Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघाला (Team India) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी पंजाब संघाच्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जितेश शर्माची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे.

बीसीसीआयने ट्वीटद्वारे एक निवेदन जारी करून संजू सॅमसन या मालिकेतून बाहेर असल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना संजू सॅमसनला दुखापत झाली होती. संजूच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो संघासह मुंबईहून पुण्यालाही गेला नाही. संजूच्या दुखापतीनंतर टीम इंडियाकडे कोणताही बॅकअप यष्टिरक्षक फलंदाज शिल्लक नसल्याने जितेश शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना संजू सॅमसनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे." संजू सॅमसनची तपासणी करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने संजू सॅमसनला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्मा टीम इंडियात सामील होणार आहे.

बीसीसीआय ट्वीट

जितेशची देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी

जितेश शर्माला अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. जितेश शर्माने या स्पर्धेत अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. जितेशने आपल्या स्ट्राईक रेटने सर्वांना प्रभावित केलं. जितेशने स्पर्धेत 175 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यापूर्वी पंजाब किंग्जकडून 12 सामने खेळताना जितेश शर्माने 29 च्या सरासरीने आणि 162 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. दरम्यान संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर त्याची दुखापत हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत टीम इंडियासाठी संजू सॅमसन हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे आता टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

कसा आहे भारताचा टी20 संघ?

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget