(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Moose Wala Murder : 10 दिवस... 8 जण कैद; कसा रचला सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट?
Sidhu Moose Wala Case : सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून त्यांच्यावर शार्प शूटर्सना रसद पुरवल्याचा आरोप आहे.
Sidhu Moose Wala Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी (Sidhu Moose Wala Murder Case) पंजाब पोलीस (Punjab Police) यांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केलं आहे. या सर्वांवर शार्प शूटर्सना रसद पुरवल्याचा आरोप आहे. त्याचवेळी अटक केलेल्यांपैकी एकानं मुसेवाला यांची सर्व माहिती शूटर्सना दिली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी खेकड्याच्या अटकेनंतर हत्येचं अनेक रहस्य उलगडण्यास सुरुवात झाली आहे. खरं तर आतापर्यंतच्या चौकशीत पोलिसांना सिद्धू मुसेवालाची हत्या गोल्डी ब्रार आणि सचिन थापन यांच्या सांगण्यावरून झाल्याचं समोर आलं आहे. यासोबतच मूसेवाला यांच्या हत्येचा कट बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.
मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांची ओळख पटली
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, बोलेरो जीप पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबते. दोन जण गाडीतून खाली उतरतात. प्रियव्रत फौजी आणि अंकित सेरसा हे दोन शार्प शुटर्स सोनीपतचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2021 रोजी सोनीपतमध्ये गँगस्टर बिट्टू बरोनाच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात प्रियव्रत फौजी सहभागी होता. तो सिसाणा गडी येथील रहिवासी आहे.
सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधील आप सरकारनं काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.
लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली हत्येची जबाबदारी
मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.
सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हत्या
पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.