अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकली, म्हणाली 'थांबवा हे सगळं' VIDEO
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींच्या मागे येण्यामुळे भडकलेली पाहायला मिळाली.

Samantha Ruth Prabhu : सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांची फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्यातून पैसे कमावण्याचं काम पापाराझी करत असतात. पापाराझी बॉलिवूडमधील कलाकारांनी कुठे गाठतील हे सांगता येत नाही. कधी ते त्याचे विमानतळावर जाऊन फोटो काढतात, तरी कधी जीम बाहेर जाऊनही थांबलेले असतात. दरम्यान, अशाच प्रकारे पापाराझी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) फोटो घेण्यास गेले होते. मात्र, यावेळी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पापाराझींच्या कृत्यावर भडकलेली पाहायला मिळाली. समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू जीममध्ये व्यायाम करायला गेली होती. यावेळी पापाराझी जीम बाहेर तिचे फोटो काढण्यासाठी वाट पाहात होते. यावेळी समंथाचा मूड ठीक नसल्याचं पाहायला मिळालं. तिने लगेच पापाराझींना "थांबवा हे सगळं", असं म्हटलं. मात्र, तरीही पापाराझी ऐकत नव्हते. त्यांनी तिच्या मागे-मागे जाण्याचा प्रयत्न सुरुच केला. त्यानंतर समंथा रुथ प्रभू भडकली आणि प्लीज जरा थांबा, असं म्हणाली. यावेळेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
‘ये माया चेसावे’ पुन्हा प्रदर्शित होणार
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘Ye Maaya Chesave’ हा सिनेमा 18 जुलै 2025 रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. घटस्फोटीत पती नागा चैतन्य आणि समंथा हिने या सिनेमात एकत्रित काम केलं होतं. नागा चैतन्यच्या करिअरमधील हा सर्वात महत्त्वाचा सिनेमा मानला जातो. ए. आर. रहमान यांचं हृदयाला भिडणारं संगीत आणि दिग्दर्शक गौतम मेनन यांचं भावनिक कथा सांगण्याचं कसब यामुळे हा चित्रपट तेलगू चित्रपटसृष्टीतील एक आधुनिक क्लासिक मानला जातो.
या पुन्हा प्रदर्शित होण्याच्या घोषणेमुळे केवळ आठवणी जाग्या झाल्या नाहीत, तर एका संभाव्य पुनर्मिलनाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. अनेक चाहत्यांना आता वाटतंय—चैतन्य आणि समंथा त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुन्हा एकत्र येणार का? अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र फक्त ही शक्यता जरी पुढे आली तरी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
संजय कपूर यांचं पार्थिव कुठंय? 6 दिवस उलटले तरीही अंत्यसंस्कार नाहीच; कुटुंबातील लोकही शांत
सोनाली बेंद्रेच्या गाण्याचं पन्हाळ्यावर शूटिंग, पाऊस-थंडीने कुडकुडली, तळपायाला ब्रँडी घासण्याची वेळ!























