करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती होता अमेरिकन? कागदपत्रांमुळे पार्थिव भारतात आणण्यास होणार उशीर?
sunjay kapur death : करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती होता अमेरिकन? कागदपत्रांमुळे पार्थिव भारतात आणण्यास होणार उशीर?

sunjay kapur death : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती संजय कपूर यांचे लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मात्र, सध्या सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांचे पार्थिव भारतात केव्हा आणता येईल, याबाबत आहे.
कायदेशीर प्रक्रिया गुंतागुंतीची
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय कपूर हे अमेरिकन नागरिक होते आणि त्यांचे निधन लंडनमध्ये झाले. त्यामुळे या मृत्यूशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे. त्यांचे निधन गुरुवारी, 12 जून रोजी झाले. आज शुक्रवार, 13 जून असून, समोर शनिवार आणि रविवारची सुट्टी येत असल्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
सोमवारपूर्वी प्रक्रिया पूर्ण होणार नाही
कुटुंबातील सूत्रांनी सांगितले की, सोमवारी पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अलीकडेपर्यंत संजय कपूर यांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) सुरू होते, जे कायद्याने आवश्यक असलेली एक प्रक्रिया आहे. त्यांच्या चुलत भावाने, जो त्या वेळी बँकॉकमध्ये सुट्टीवर होता, आपली ट्रीप अर्धवट सोडून लंडनला पोहोचण्याची तयारी केली आहे, जेणेकरून पार्थिव भारतात आणता येईल.
शेवटचा निर्णय उद्या घेतला जाणार
संजय कपूर यांच्या कुटुंबाची पूर्ण इच्छा आहे की त्यांच्यावर भारतात अंतिम संस्कार व्हावा. मात्र, कायदेशीर अडथळे तसेच विलंब झाल्यास, अंतिम संस्कार यूकेमध्येच करावा लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना संजय कपूर यांचे सासरे म्हणाले होते, “पोस्टमार्टमची प्रक्रिया सध्या सुरू आहे, आणि एकदा कागदोपत्री कामकाज पूर्ण झालं की, पार्थिव अंतिम संस्कारासाठी भारतात आणलं जाईल.”
आता उपलब्ध झालेल्या नव्या माहितीनुसार हे स्पष्ट होतंय की, विलंब होण्यामागे काय कारणं आहेत. सूत्रांनी सांगितले की, कुटुंबीय सध्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि उद्यापर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येईल की पुढील प्रक्रिया काय असावी.
संजयचे तीन विवाह झाले होते. त्यांचा पहिला विवाह फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबत झाला होता. संजयने करिश्मा कपूरशी 2003 साली विवाह केला. या दोघांना 2005 साली मुलगी समायरा आणि 2011 साली मुलगा कियान झाला. 2014 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यांचा घटस्फोट 2016 मध्ये पूर्ण झाला. विभक्त झाल्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
दोन पेग घेण्यात काही वाईट नाही, जावेद अख्तर यांच्याकडून दारुची धर्मासोबत तुलना, 'पण लिमिटमध्ये..'























