एक्स्प्लोर
डोनॉल्ड ट्रम्प यांच्या पत्नीवर भाषण चोरीचा आरोप
1/3

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव निश्चित झाले आहे. पण सध्या त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. कारण त्यांची पत्नी मेलानियाने रिपब्लिक नॅशनल कन्वेक्शनमध्ये केलेले भाषण हे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची पत्नी मिशेल ओबामा यांनी 2008साली दिलेल्या एका भाषाणाचा भाग असल्याचा आरोप होत आहे.
2/3

46 वर्षीय मेलानिया आपल्या भाषणावेळी म्हणाल्या की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवे आहे, त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असते. तुम्ही जे बोलता, ते करावे लागते. शिवाय तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहणार आवश्यक आहे. तसेच सर्वांशी सन्मानाने वागणूकही महत्त्वाची आहे. माझ्या आई-व़डीलांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभवाच्या आधारे नैतिक मुल्ये आम्हाला घालून दिली. आम्हाला आमच्या मुलांना शिक्षित बनवलं पाहिजे हीच शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली. अशाच प्रकारची काही वाक्ये मिशेल ओबामा यांनीही 2008च्या डेमोक्रेटिक नॅशनल कन्वेशनमध्ये वापरली होती.
Published at : 20 Jul 2016 06:47 PM (IST)
View More























