एक्स्प्लोर
मॅन्चेस्टर स्फोटानंतर अरियाना ग्रांडेचा मन हेलावणारा मेसेज!
मॅन्चेस्टर : इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. मॅन्चेस्टर एरिनामध्ये सोमवारी रात्री पॉप सिंगर अरियाना ग्रांडेच्या कॉन्सर्टदरम्यान दोन बॉम्बस्फोट झाले, ज्यात 20 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक लोक जखमी झाले.
पॉप सिंगर अरियाना ग्रांडे सुरक्षित असली तरी ती कोलमडली आहे. ज्यावेळी स्फोट झाला, तेव्हा अरियानाचा परफॉर्मन्स सुरु होता. आपल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर दु:खी अरियानाने आज सकाळी (मंगळवार) ट्वीट करुन लोकांची माफी मागितली आहे. "अगदीच कोलमडले आहे...मी यासाठी मनापासून माफी मागते, माझ्याकडे शब्द नाहीत, असं ट्वीट तिने केलं आहे."
https://twitter.com/ArianaGrande/status/866849021519966208
मॅन्चेस्टरच्या स्थानिक वेळेनुसार अरियाना ग्रांडेने पहाटे 4 वाजता ट्वीट केलं. अरियानाचं हे ट्वीट तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त युझर्सनी रिट्वीट केलं असून साडे पाच लाखांहून जास्त ट्विपल्सनी ते लाईक केलं आहे.
कोण आहे अरियाना ग्रांडे?
- अमेरिकेची प्रसिद्ध पॉप सिंगर
- हॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये काम
- 'डेंजरस वूमन' नावाचा म्युझिक अल्बम
- 'डेंजरस वूमन' नावानेही ओळख
- अवघ्या 21 व्या वर्षात प्रसिद्धी
- टाइम मासिकाच्या 100 प्रभावी व्यक्तींमध्येही स्थान
- एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक पुरस्कारानेही सन्मानित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement