बांग्लादेशमधील प्रमुख पत्रिका प्रोथोम आलो याने केलेल्या दाव्यानुसारस, फराजने तरीषा जैन या भारतीय आणि अबनीता कबीर या अमेरिकन मैत्रिणींसाठी आपल्या प्राणांचा त्याग केला. वृत्तपत्राने सांगितल्यानुसार, दहशतवादी हल्ल्यावेळी फराज मुसलमान असल्याने त्याला दहशतवाद्यांनी बाहेर जाण्यास परवानगी दिली होती. पण मित्रांना संकटात सोडून जाण्यास तो तयार नसल्याने दहशतवाद्याने त्यालाही कंठस्नान घातले.
2/6
पण सध्या तरी बांग्लदेश पोलीस आणि सरकारच्यावतीने फराजच्या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
3/6
1 जुलै रोजी बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या फराज हुसैनचाही सहभाग होता. पण हल्ल्याच्या दोन दिवसानंतर फराजच्या नावावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
4/6
पण आता बांगलादेशातील एक वृत्तपत्र निरापेक्खाने दिलेल्या माहितीनुसार, फराजचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या फोटोनुसार, तो या हल्ल्यावेळी मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्यासोबत दिसतो आहे.
5/6
या दैनिकाने प्रोथोम आलोवर ही पत्रिका फराजच्या आजोबांची असल्याने फराजने मैत्रीसाठी जीव दिल्याचे सांगितल्याचा आरोप केला आहे.
6/6
दैनिक निरापेक्खाचे संपादक शफीकुर रहमान नवाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, फराजचे हे फोटो तो दहशतवादी आहे की नाही याची पडताळणी करताना मिळाल्याचे सांगितले.