एक्स्प्लोर
India - China Border Crisis Ended : लडाखमधील भारत-चीन लष्करी संघर्ष संपुष्टात
अखेर भारत आणि चीनमधील दोन वर्षांचा लष्करी संघर्ष संपुष्टात आलाय. दोन्ही देशांच्या सैन्यांनी पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात गस्त बिंदू १५ वरून माघार घेतलीय. पाच दिवस माघारीची प्रक्रिया सुरू होती. तात्पुरत्या पायाभूत सुविधादेखील शेवटच्या दिवशी पाडण्यात आल्या. योजनेनुसार दोन्ही देशांच्या सैन्याला परत पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही तर या संपूर्ण प्रक्रियेची पडताळणीही केली जात आहे. परिसरातील संपूर्ण जमिनीचे सपाटीकरण करण्यात आलेय. पुन्हा घुसखोरी न करण्याची ग्वाही चीननं दिल्याचं सांगितलं जातंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















