IND vs AUS ICC World Cup 2023: वन डे विश्वचषकाचा अंतिम सामन्यासाठी क्रीडा चाहत्यांची उत्सुकता शिगेला
India vs Australia World Cup Final 2023 : वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणारय..विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी पाहूयात...
भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवास -
विश्वचषकात भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.