IND vs SA T20 WC : टी-20 विश्वचषकात भारत-दक्षिण आफ्रिकेची लढाई, भारत जिंकल्यास कुणाल फायदा?
T20 विश्वचषकात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.. पर्थच्या मैदानावर दुपारी साडेचार वाजता हा सामना सुरु होईल... भारतीय संघाने या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली. त्यानंतर आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या खेळीमुळे दुसऱ्या सामन्यात भारताने तुलनेने दुबळय़ा नेदरलँड्सला शह दिला. त्यामुळे चार गुणांसह भारतीय संघ गट-२ मध्ये पहिल्या स्थानावर आहे.. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघही फॉर्मात आहे.. त्यामुळे पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर आफ्रिकेन गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे... या सामन्यात के.एल.राहुलच्या कामगिरीवर साऱ्यांचं लक्ष असेल.. दुसरीकडे या सामन्यावर पाकिस्तानचंही लक्ष असेल. भारताच्या विजयासाठी पाकिस्तानी संघ प्रार्थना करेल. भारत मोठ्या फरकाने विजयी झाल्यास पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राहतील...