पुणे मेट्रो 3 बाबत PMRDA आयुक्त किरण गित्तेंसोबत गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
संभाजी उद्यानातील या प्रतिकृती फिरुन मेट्रोचा फिलं घेणं हे पुणेकरांच्या नशिबी आलंय कारण पुणे मेट्रोचं काम कासवाच्या चालीपेक्षाही संथ गतीनं सुरु आहे 2 वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नरेंद्र मोदींनी पुण्यात येऊन मेट्रोच्या पहिल्या दोन टप्यांचं भूमीपूजन केलं वाटलं आता पुणेकरांची मेट्रो सुसाट धावणार पण कसलं काय? नकटीच्या लग्नाला 17 विघ्नं तशीच काहीशी अवस्था या पुणे मेट्रोची झालीय आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा तिसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजनाचा घाट घालण्यात आलाय. हिंजवडीमध्ये दररोज सव्वा लाख वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे हा निर्णय योग्यच आहे असं MMRDA आयुक्त किरण गित्ते यांचं म्हणणं आहे.



















