Yavatmal Lok Sabha : यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून पैशाचे वाटप, ठाकरे गटाचा आरोप
Yavatmal Lok Sabha : यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून पैशाचे वाटप, ठाकरे गटाचा आरोप
यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करुन मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहून, त्यांच्या बोटाला शाई लावून पैशाचं वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला. यानंतर यवतमाळ वाशिमचे मविआ उमेदवार संजय देशमुख या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा अशी मागणी करत देशमुख पोलीस स्टेशनमध्ये आहेत























