एक्स्प्लोर
Plane Crash in Malaysia : मलेशियात विमानाचा भीषण अपघात, लँडिंगदरम्यान विमान गाड्यांना धडकलं
मलेशियाच्या सेलांगोरमध्ये विमानाचा भीषण अपघात झालाय. एलमिना व्हॅली निवासी भागातील सेंट्रल पार्कजवळ लॅंण्डिंग दरम्यान एक विमान दोन वाहनांना धडकलंय. त्यामुळं 10 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जेट व्हॅलेट विशेष खासगी उड्डाण सेवेचं हे विमान होतं. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होते. अपघातात त्यांचाही मृत्यू झालाय.
आणखी पाहा























