(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia vs Ukraine : रशिया - युक्रेनचं युद्ध पुन्हा का पेटलं? काय आहेत कारणं? Special Report
रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे... सध्या रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचलाय.. या दोन्ही देशातील तणावाला सुमारे सात महिने पूर्ण झाले असले, तरी यांच्यातील तणाव मिटण्याची चिन्हं नाहीत. त्यातच रशियाने जेपोरिजियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झालाय.. तर जवळपास 40 युक्रेनियन नागरिक जखमी झालेत. तत्पूर्वी शनिवारी रशियाच्या ताब्यातील क्रीमियामध्ये मोठा स्फोट झाला होता. यासाठी युक्रेन जबाबदार असल्याचा आरोप रशियाने केलाय.. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सुरक्षा परिषदेसोबत महत्त्वाची बैठक बोलावलीय. त्यामुळे युक्रेनही सतर्क झालंय. युक्रेनमध्ये हवाई अलर्ट जारी करण्यात आलाय. पुतीन यांच्याकडून युक्रेनवर हल्ला होण्याचा धोका नाकारता येत नाही.. त्यामुळे युक्रेनियन सरकारने हे पाऊल उचललंय.