Omicron COVID19 New Variant: धोका किती,उपाय काय?नव्या व्हेरियंटची ABCD; Raman Gangakhedkar EXCLUSIVE
Coronavirus new variant : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नवीन स्वरूपाला घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन ICMRचे माजी संचालक डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले. कोरोना प्रतिबंधक लस घेणे आणि कोविडबाबतची खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.
या विषाणूमुळं दवाखान्यात भर्ती व्हावं लागतंय, का मृत्यू जास्त होत आहेत का याबाबत अधिक स्पष्टता नसल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले. आफ्रिकेतील परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे यासाठी काही वेळ आहे. अर्थात काळजी घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिस्थिती अजून गंभीर झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. या विषाणूमध्ये 50 म्युटेशन आहेत. लस घेतली म्हणून कोविड खबरदारीचे नियम पाळणार नाही अशी भावना बाळगणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांनी प्राधान्याने लस घ्यावी असेही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले