Korea War :उत्तर कोरियाची दक्षिण कोरियाला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी,जगाची चिंता वाढणार? Special Report
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिलीय. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किंम जोग उन यांच्या बहिणीने हा इशारा दिलाय. दोन दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सूह वुक यांनी देशाच्या सैन्य क्षमतेबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. दक्षिण कोरियाकडे अचूक वेध घेणारी क्षेपणास्त्र असून उत्तर कोरियातील कोणत्याही लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असल्याचं वुक यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यानंतर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला अणुबॉम्ब हल्ल्याचा इशारा दिलाय.. वुक यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले असून लष्करी तणाव निर्माण झाल्याचे किम जोंग उन यांनी म्हटलंय. यानंतर किम जोंग उन यांच्या बहिणीने दक्षिण कोरियाला थेट अणुबॉम्ब हल्ल्याचा इशारा दिल्याने साऱ्या जगाची चिंता वाढलीय.























